त्या पत्राने माझ्या स्वाभिमानाला ठेच : राऊत

शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये आमच्या विचारांपेक्षा वेगळ्या लोकांच्या भूमिकाही प्रसिद्ध करणे हे आमचे धोरण आहे.
संजय राऊत
संजय राऊतsakal

मुंबई : शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये आमच्या विचारांपेक्षा वेगळ्या लोकांच्या भूमिकाही प्रसिद्ध करणे हे आमचे धोरण आहे. चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यानेच त्यांचे पत्र प्रसिद्ध करून त्यांची भूमिका प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. या पत्रात त्यांनी वैयक्तिक निंदानालस्तीच अधिक केली आहे. या पत्रामुळे माझ्या स्वाभिमानाला ठेच लागली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मानहानीचा सव्वा रुपयांचा दावा करणार आहे,’’ अशी नाराजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

संजय राऊत यांच्याशी ‘सकाळ’ने खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय वादावर टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘‘राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात टीका सहन केली पाहिजे व टीकेला टीकेनेच उत्तर दिले पाहिजे या मताचे आम्ही आहोत.’’ पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा राऊत करणार आहेत. ही किंमत थोडी वाढवायला हवी, असे विधान पाटील यांनी केले. यावर राऊत म्हणाले, ‘‘किंमत कशाला वाढवायची. मला त्यांच्याकडून शंभर-सव्वाशे कोटीची गरज नाही. ’’

संजय राऊत
पुणे : मोबाईल चोरांची टोळी जाळ्यात

‘‘सोमय्यांवरील कारवाई गृह विभागाने केली होती. स्थानिक पातळीवरील ही कारवाई असल्याने मुख्यमंत्री कार्यालयाचा त्याच्याशी संबंध नव्हता हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता. पण शिवसेनेने हात झटकले असा सूर माध्यमांनी लावला त्याला काही अर्थ नाही.’’

मुलाखतीत संजय राऊत यांनी दिलेली उत्तरे...

अनंत गीते यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे.

अनंत गीते यांचे विधान ही शिवसेनेची भूमिका नाही. शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सरकारमध्ये शिवसेना काम करत आहे. तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांचा सन्मान राखावा, ही आमची भूमिका आहे.

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव भाजपकडून आला का?

स्वप्ने पाहण्यावर अद्याप ‘जीएसटी’ लागत नसल्याने भाजप पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्ने पाहात आहे. सध्या असलेल्या व्यवस्थेतच पाच वर्ष मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com