Sanjay Raut सकाळ डिजिटल टीम
Sanjay Raut सकाळ डिजिटल टीम

'डोक्यावर बंदूक लावाल ना माझ्या..' EDचा छापा पडताच संजय राऊत संतापले

सक्तवसुली संचलनालयाने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. यानंतर आता ईडीने राज्यात मोठी कारवाई केली आहे. खासदार संजय राऊत यांच्या आलिबाग आणि दादरमधील मालमत्तांवर छापेमारी सुरू झाली आहे. सध्या संजय राऊत दिल्लीत आहेत. आज ते गडकरी आणि शरद पवारांसोबत डिनरला जाणार आहेत.

त्याआधीच राऊत यांच्यावर छापा पडल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Sanjay Raut सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्राने जपून रहावं! किती चिकन घेतलं याकडे भाजपचं लक्ष; ईडीला कळवतील

राऊत यांचे दादरमधील मालमत्ता आणि आलिबागमधील आठ भूखंड जप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय. राऊत यांनी मोदी सरकारवर संताप व्यक्त करत आरोपांचं खंडन केलं आहे. त्यांना वाटत असेल शिवसेना फसली आहे. पण सूडाच्या राजकारणापुढे आम्ही गुढगे टेकणार नाही, असं राऊत म्हणाले.

तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी त्यापुढे गुडघे टेकणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय. डोक्यावर बंदूक लावाल ना माझ्या, मी तयार आहे, असं उलट आव्हान त्यांनी केंद्रीय यंत्रणांना दिली आहे. माझा हिरेन पांड्या होण्याची भिती आहे. कधीही हल्ला होऊ शकतो, असंही वक्तव्य राऊत यांनी केलंय.

Sanjay Raut सकाळ डिजिटल टीम
ED ची मोठी कारवाई, संजय राऊतांची मालमत्ता जप्त

'जे नाचे आता नाचत आहेत, त्यांच्यावर राजकीय दबाव'

ज्या पद्धतीने आम्ही सरकार स्थापन केलं आहे. या पद्धतीने राज्यातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी राज्यसभेत व्यकय्या नायडूंना पत्र लिहिलं आहे. केंद्रातील यंत्रणा मोठ्या प्रमाणात राज्यांवर खार खाऊन आहेत. आमच्या कष्टाच्या पैशातून आम्ही संपत्ती घेतली आहे. त्यामुळे अवैध संपत्ती काढून दाखवा, माझी सगळी मालमत्ता भाजपच्या नावावर करीन, असं राऊत यांनी म्हटलंय.

जे नाचे आता नाचत आहेत. हा राजकीय दबाव आहे. भाजपला मिळणाऱ्या देणगीदारांची चौकशी व्हायला हवी. हा एक सूड आहे. मराठी लोकांना यातून तुमचा खरा चेहरा कळेल, असं राऊत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com