
Sanjay Raut addressing a press conference in Mumbai, accusing BJP and Mahayuti of winning Maharashtra elections through vote theft, corruption, and fake narratives.
esakal
Summary
राऊतांनी भाजपच्या आयटी सेलवर फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा आरोप केला, विशेषतः राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात.
शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, राऊत म्हणाले की संकटकाळात महाराष्ट्राचे नेते नेहमी एकत्र येतात.
त्यांनी नमूद केले की नरेंद्र मोदींना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्वी मदत केली होती, पण त्याचे फळ योग्य मिळाले नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात महायुतीचा विजय हा मतचोरी आणि घोटाळ्यातून झाल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. राज्यातील अनेक मुद्द्यांवर त्यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले.निवडणूक आयोग आणि भाजपची पार्टनरशिप असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला तर अजित पवारांचे चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवरही त्यांनी "ऐसा कोई सगा नही जिसको भाजपने ठगा नही" अशी मार्मिक टीका केली.