'राष्ट्रपतीपदासाठी भाजपने शरद पवारांना उमेदवारी द्यावी'

Sanjay Raut on Sharad Pawar
Sanjay Raut on Sharad Pawaresakal

केंद्रीय निवडणूक आयोगाने भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी म्हणजे राष्ट्रपतीपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल व २१ जुलै रोजी दिल्लीत निकाल जाहीर करण्यात येतील.

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. यानंतर शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. (Sanjay Raut)

Sanjay Raut on Sharad Pawar
Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपतीपदासाठी सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार नसतो. केवळ विधानसभा व लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधीचे या निवडणुकीत मतदान करू शकतात. त्यांच्या मतांचे मूल्य विजयी उमेदवार ठरवतं. (Sanjay Raut on Sharad Pawar)

सध्या आकड्यांचं समीकरण पाहता भाजपचं पारडं जड आहे. भाजपने दिलेला उमेदवार राष्ट्रपतीपदावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने शरद पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी शिवसेनेच्या गोटातून होत आहे.

'निवडणुकांमध्ये हार होत असते'

हा दौरा पूर्वनियोजित आहे. कोवीडचा कालखंड असल्याने झाला नव्हता. मुख्यमंत्र्यांनीही या दौऱ्याला येण्याचा विचार केला होता. मात्र, राजकीय शक्तीसाठी अय़ोध्येची भूमी वापरायची नाही, असं आम्ही ठरवलंय. काही लोकांच्या राजकीय आयुष्यात विरोध आणि विरोध करणं म्हणजेच राजकारण असतं. अशी लोकं सतत विघ्न आणतात.

पण आम्ही त्या पलिकडे पाहातो. लोक हरत असतात. निवडणुकीत पराभव होत असतो. असं घडत असतं. तुम्ही गणितं आणि आकड्यांच्या समीकरणावर एक जागा निवडून आणली आणि निवडणूक जिंकल्याचं सांगत आहात. मात्र आमच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं पडली आहेत, असं राऊत म्हणाले.

शरद पवारांच्या नावावर सर्वांची सहमती असेल

शरद पवार देशातील सर्वाधिक मोठे नेते आहेत. सगळ्यात अनुभवी आहेत. त्यांच्या नावावर सर्वांची अनुमती होऊ शकते. ज्यांची मनं मोठी आहेत. त्यांनी यावर अमल करावं, पण ज्यांचं मन मोठं आहे त्यांचा हा विषय आहे. सरकारला उत्तम राष्ट्रपती हवा. रबर स्टँप असू नये, असा टोला त्यांनी लगावलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com