esakal | तुमची दारे आता बंद करा - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut

सरकार स्थापन करण्यासाठी चर्चेची वेळ निघून गेली, आता तुमची दारे बंद करा, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपला फटकारले. शिवसेनेसाठी चर्चेची दारे खुली असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

तुमची दारे आता बंद करा - संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - सरकार स्थापन करण्यासाठी चर्चेची वेळ निघून गेली, आता तुमची दारे बंद करा, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपला फटकारले. शिवसेनेसाठी चर्चेची दारे खुली असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेनेने जनमताचा अनादर करून अपेक्षाभंग केला, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. यावर ‘आता आम्ही त्यांच्या कोणत्याही वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे’ प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. तसेच, शिवसेनेसाठी भाजपची दारे उघडी आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत म्हटले होते. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले, की आता दरवाजे उघडे ठेवले आहेत. मात्र जेव्हा दारे उघडायची होती, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले. ज्या गोष्टी ठरल्या होत्या, त्या स्वीकारायला तयार नव्हते. हे चित्र कसे निर्माण झाले, याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे राऊत म्हणाले.

देशभरात वाहनांसाठी आजपासून फास्टटॅग अनिवार्य, कारण...