
संजय राऊत बंडखोर आमदारांच्या टार्गेटवर; संजय राठोड म्हणाले...
मुंबई : बंड पुकारणारे एकनाथ शिंदे व आमदारांनी महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे असे म्हणत बंड पुकारले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करा, असे म्हटले. आता ते खासदार संजय राऊत यांना टार्गेट करीत असल्याचे दिसत आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामुळेच शिवसेनेतून बाहेर पडलो, असे यवतमाळचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) म्हणाले.
एकनाथ शिंदेंसह आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना हादरली. उद्धव ठाकरे हे आमदार परत येणार असे म्हणत होते. एकनाथ शिंदे माझे ऐकतील व शिवसेनेत (shiv sena) परत येतील, असेही ते म्हणाले होते. दुसरीकडे खासदार संजय राऊत हे बंडखोर आमदारांना धमक्या देत होते. आमदारांना डुक्कर म्हटले. गुवाहाटीतून ४० मृतदेह परत येणार इतकेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते.
हेही वाचा: बीएमसी निवडणूक : उद्धव सेना आपला बालेकिल्ला राखणार?
बंडखोर आमदारांची समजूत घालण्यासाठी मी, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांना सुरतला पाठवावे असे म्हटले होते. मात्र, संजय राऊत यांना त्याला विरोध दर्शवला व दुसऱ्यांना पाठवले. आमदार तितके जाण्यासाठी निघाले नाही तोच घरावर हल्ले करायला लावले. हे प्रकरण संजय राऊत यांच्यामुळेच बिघडले, असेही संजय राठोड (Sanjay Rathod) म्हणाले.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामुळे हे प्रकरण चिघळत गेले. त्यांनी अत्यंत वाईट भाषेचा वापर केला. यामुळे आमदारांच्या मनात अधिक राग निर्माण झाला. अशाने कसे जमणार होते. संजय राऊतमुळेच आम्ही बाहेर पडलो. मातोश्रीचे दार उघडल्यास पुन्हा जाईल, असेही संजय राठोड म्हणाले.
Web Title: Sanjay Raut Target Mla Sanjay Rathod Shiv Sena
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..