"महाग पडेल म्हणजे? Ed पकडून आणखी एक खोटे कांड करणार… बरोबर?"

Sanjay Raut
Sanjay Raute sakal

राज्य सरकार आणि भाजप यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे, महाविकास आघाडी सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते यांची हातमिळवणी असल्याचा आरोप केला आहे. त्यातच नुकतेच सामनामधून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी 22 तास काम करतात. उरलेले दोन तास झोपही पंतप्रधानांना येऊ नये यावर संशोधन सुरू आहे, चमच्यांचे हे विधान ऐकून पंतप्रधान मोदींची (PM Modi) दोन तासांची झोपही उडाली असेल! असा टोमणा लगावला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी 'राऊत माझी वारंवार चेष्टा करतात, त्यांनी ही चेष्टा महागात पडणार आहे', असा इशारा दिला होता. आता यावर देखील राऊत यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रीया दिली आहे.

Sanjay Raut
"तुमचा कव्हर ड्राईव्ह…! "; संजय राऊत यांना चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे, ते म्हणाले की, "नव्या धमकी बद्दल धन्यवाद.महाग पडेल म्हणजे? Ed पकडून आणखी एक खोटे कांड करणार. बदनामी मोहीम राबवणार. मुलाबाळांना त्रास देणार. बरोबर?" . या सोबतच संजय राऊत यांना भाजपला त्यांच्या भाषेची आठवण करुन देत मुख्यमंत्र्यांबद्दल तसेच शिवसेनेची चेष्ठा केल्याची आठवण करुन दिली. ते म्हणाले की, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबाबत जी भाषा तुम्ही वापरता. चेष्टा करता ते सहन करायचे ? शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय." असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut
सामना वाचणं बंद केलं, राऊतांवर बोलणं बंद केलं - चंद्रकांत पाटील

यापुर्वी चंद्रकांत पाटील यांनी, राऊतांना माझी चेष्टा करणं महागात पडणार आहे. महाविकास आघाडीचे महान नेते कोणतेही आरोप करुदेत काही फरक पडत नाही. कारण केंद्रीय तापस यंत्रणांची स्वायत्ता आहे. त्यांचे अधिकार ते वापरु शकतात. सत्ताधारी पक्षातील काहीजण जात्यात आहेत तर काहीजण सुपात, जात्यात गेलेल्यांच पीठ झालं आहे. काहीजण अजून जात्यात जाणार आहेत, असं सूचक विधानाही त्यांनी केलं.

Sanjay Raut
पुण्यात Ola S1 pro इलेक्ट्रिक स्कूटरला आग; कंपनी म्हणते की..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com