esakal | Video : झोपेतही बडबडायचो, मुख्यमंत्री शिवसेनेचाच : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

भाजप आणि सेनेचा वाद आणि त्यात राष्ट्रवादीने मारलेली मुसंडी आणि नंतर काँग्रेसची ती भूमिका असा सगळा भडका राज्याच्या राजकारणात एकच उडाला. यात शिवसेनेसाठी महत्वाची भूमिका बजावली ती संजय राऊतांनी. मुख्यमंत्री सेनेचाच होणार या शब्दांवर अडून बसणारे राऊत किती कणखर राहिले त्या काळात याचा अनुभव त्यांनी कथन केलाय.

Video : झोपेतही बडबडायचो, मुख्यमंत्री शिवसेनेचाच : संजय राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवेळी यंदा महिनाभर चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. पण, या गोंधळात शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे पहिल्यापासून सांगत होते आणि अगदी झालेही तसेच. आता याबाबतचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, संजय राऊत यांनी मी झोपेतही मुख्यमंत्री शिवसेनेचाच असे बडबडायचो असे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

भाजप आणि सेनेचा वाद आणि त्यात राष्ट्रवादीने मारलेली मुसंडी आणि नंतर काँग्रेसची ती भूमिका असा सगळा भडका राज्याच्या राजकारणात एकच उडाला. यात शिवसेनेसाठी महत्वाची भूमिका बजावली ती संजय राऊतांनी. मुख्यमंत्री सेनेचाच होणार या शब्दांवर अडून बसणारे राऊत किती कणखर राहिले त्या काळात याचा अनुभव त्यांनी कथन केलाय.

पायाभूत प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हे झोपेतही सुद्धा बडबडायचो, असा खुलासा संजय राऊतांनी केलाय. महाराष्ट्रातील थरारक सत्ता संघर्षाचा अनुभव शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी, दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी सांगितला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील विश्वासाचा धागा अतूट आणि मजबूत ठेवण्याची कामगिरी संजय राऊत यांनी कशी पार पाडली. याचा वृत्तांत स्वत: संजय राऊत यांनीच खासदारांसमोर जाहीर केला.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय भूंकपावर भाष्य केलंय. दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी संजय राऊत यांनी अनेक किस्से सांगितले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, ही मागणी लावून धरणारे संजय राऊत चक्क झोपेतही तेच बडबडायचे, असा खुलासाही त्यांनी स्वतःच केलाय.