‘इंतजार करो कलतक’; राऊतांचा भाजपाला इशारा; कोणता बॉम्ब फोडणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut's new blast and warning BJP

‘इंतजार करो कलतक’; राऊतांचा भाजपाला इशारा; कोणता बॉम्ब फोडणार?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप यांच्यातील वार काही केल्या संपताना दिसत नाही आहे. भाजप आणि संजय राऊत एकमेकांच्या मागे लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशात संजय राऊत यांनी ‘इंतजार करो कलतक!’ असे ट्विट केले आहे. हे ट्विट त्यांनी किरीट सोमय्या, बीजेपी महाराष्ट्र, पीएमओ इंडिया, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींना ट्विट केले आहे. यामुळे उद्या काय होणार याची उत्सुकता लागली आहे. (Sanjay Raut's new blast and warning BJP)

मुंबई महापालिकेतील (BMC) भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भाजपकडून पोलखोल अभियान सुरू करण्यात आले. त्यापूर्वीच भाजपच्या पोलखोल रथाची (BJP vehicle Vandalised) अज्ञातांनी तोडफोड केली होती. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात होत्या. तरीही भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते. आता ‘संकल्प भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा’ असे ट्विट संजय राऊत यांच्याकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रियकराचा खून; लग्नघरी स्मशान शांतता

मागेही संजय राऊत यांनी साडेतीन नेत्यांचा भष्ट्राचार बाहेर काढणार असल्याचे सांगितले होते. याची दोन दिवस चांगलीच चर्चा होती. पत्रकार परिषद घेतल्यावर त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. ते साडेतीन नेते कोण हे अद्याप कुणाला समजले नाही. यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. आता ते पुन्हा भ्रष्टाचार काढणार असल्याचे म्हणतात. यामुळे पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

Web Title: Sanjay Rauts New Blast And Warning Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top