Murder : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रियकराचा खून; लग्नघरी स्मशान शांतता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder of wifes boyfriend in Nagpur

पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रियकराचा खून; लग्नघरी स्मशान शांतता

नागपूर : पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना भालदारपुऱ्यात सोमवारी उघडकीस आली. तरुणाचा मृतदेह (Murder) त्याचाच घरात रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. विजय अंकुश तायवाडे (२२, रा. स्वीपर कॉलनी, भालदारपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना (accused arrested) अटक केली आहे. तिघांनीही खून केल्याची कबुली दिली. (Murder of wifes boyfriend in Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय ऊर्फ पापा संजय बक्सरे (२३), अभय सुनील सातपुते (२१) दोन्ही रा. भालदारपुरा आणि सूरज ऊर्फ वाट्या टिकाराम धापोडकर (२८, रा. मंगळवारी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी सूरज हा तडीपार आहे. तरीही तो शहरात फिरत होता. विजयचे अक्षयच्या पत्नीसोबत लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही त्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. अक्षय यामुळे अस्वस्थ होता. त्याने अनेकदा विजयला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकत नव्हता.

हेही वाचा: नागपूर रेल्वे स्थानकावर आढळली स्फोटके; उंदरांमुळे प्रकार उघडकीस

विजय लहानपणापासूनच आई, भाऊ आणि बहिणीसह आजीकडे राहत होता. त्याचे वडील खापरखेड्यात सफाई कामगार आहेत. विजयची प्रेयसी लग्नानंतरही सतत त्याला भेटत होती. आवश्यकता असल्यास त्याला पैसेही पुरवत होती. अक्षयला हे आवडत नव्हते. दोन दिवसांपूर्वी अक्षय तीन मित्रांसह विजयच्या घरी आला होता. तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली होती.

आरोपी वरचढ ठरताना पाहून विजयने तेथून पळ काढला होता. नाहीतर त्याच दिवशी त्याचा खून (Murder) झाला असता. रविवारी मध्यरात्री अक्षयने सापळा रचून तसेच मित्रांसोबत मिळून विजयचा खून केला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा: Nagpur : एक, दोन नव्हे तर तब्बल ४० सिलिंडरचा स्फोट; टिनाचे पत्रे वितळले

हत्या करून घरात आणला मृतदेह

विजयच्या मोठ्या वडिलांकडे सोमवारी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम होता. कुटुंबातील सर्व सदस्य एक दिवस आधीच लग्न घरी गेले होते. विजय सायंकाळी येणार होता. तो टकला नावाच्या मित्रासह सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दुचाकीने लग्न घरी जाण्यासाठी घरून निघाला. तेव्हापासून तो, मित्र आणि वाहन दोघेही गायब आहेत. मात्र, दुचाकीची चावी विजयच्या पॅन्टच्या खिशात होती. विजयची बाहेर कुठेतरी हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह घरात आणून ठेवला आणि फरार झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तत्काळ अक्षयसह जवळपास १० लोकांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. यानंतर अक्षय, सूरज आणि अभयने खुनाची (accused arrested) कबुली दिली.

Web Title: Murder Of Wifes Boyfriend Peace At The Wedding Accused Arrested Crime News Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurmurderCrime News
go to top