

Sanjay Rautvs amol kolhe Delimitation Bill
esakal
Amol Kolhe : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतही मतभेद उघड झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अद्याप विधेयकाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नसताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. ‘आम्ही लढू त्या जागांवर कसे निवडून येता, ते बघतो,’ असा थेट इशाराच राऊत यांनी कोल्हे यांना दिला.