गद्दारी केलेल्या दिपक केसरकरांनी राणेंवर बोलु नये; संजू परब भडकले : Sanju Parab | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepaek Keserker, Sanju Parab

गद्दारी केलेल्या केसरकरांनी राणेंवर बोलु नये; संजू परब भडकले

सावंतवाडी : नारायण राणे (Narayan Rane) यांच्यामुळेच दिपक केसरकर (Deepak Kesarkar)नगराध्यक्ष व आमदार होऊ शकले. नाहीतर आज ते दिसलेच नसते. त्यामुळे या आधी गद्दारी केलेल्या केसरकरांनी राणेंवर बोलु नये, असे प्रत्युत्तर नगराध्यक्ष संजू परब (Sanju Parab)यांनी राणेंवर झालेल्या टिकेच्या अनुषंगाने दिले. आपल्या निष्क्रीयतेचा ठपका ठेकेदारांवर फोडणारे केसरकर जनतेची दिशाभूल करीत आहेत. ते आमदार असेपर्यंत मल्टी स्पेशालिटीहॉस्पिटल सोडाच, उपजिल्हा रुग्णालयाचे काम व वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदेही भरू शकणार नाही, अशी टीकाही नगराध्यक्ष परब यांनी केली. येथील पालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, पालिका सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, केतन आजगांवकर, महेश पांचाळ, अमित परब, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष परब म्हणाले, "तत्कालीन मुख्यमंत्री राणे यांनी आपल्या तीन नगरसेवकांची साथ दिल्यानेच केसरकर पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. त्यानंतर पालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात झालेल्या आपल्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेळाव्यात राणे यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या एका आदेशामुळे केसरकर पहिल्यांदा आमदार झाले. दुसऱ्या वेळा संस्कृतीचे व कथित दहशतवादाचे रडगाणे गाऊन तर तिसऱ्यांदा सेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे फोटो वापरून मते मिळवुन आमदार झाले. त्यावेळी राजन तेली यांना भाजपचे चिन्ह मिळाले असते तर सरकाराचा पराभव निश्चित होता."

हेही वाचा: Delhi Pollution: दिल्लीत शाळा- काॅलेज सुरु ; Work From Home बंद

काय म्हणाले दिपक केसरकर

राणेंनी मला कितीही विरोध केला तरी त्यांच्या नाकावर 'टिच्चून' तब्बल तीन वेळा आमदार झालो. त्यामुळेच राणे अंगावर आले तर मी शिंगावर घ्यायला तयार असल्याचा टोला आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे लगावला. निलेश राणे यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी माझी भूमिका महत्त्वाची होती; परंतु नंतर ते का खासदार होऊ शकले नाहीत याचा विचार त्यांनी करावा.

loading image
go to top