esakal | संजय राऊत पुन्हा पवारांच्या भेटीला; काय असेल निरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjya Raut meets Saharad pawar second time in a day

पहिल्या क्रमांकाचा पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला जात आहेत.

संजय राऊत पुन्हा पवारांच्या भेटीला; काय असेल निरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पहिल्या क्रमांकाचा पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेनेचे खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला जात आहेत.

काँग्रेसचे प्रमुख नेते यापूर्वीच शरद पवारांच्या सिल्व्हर ओक येथे पोहचले आहेत. आता याठिकाणी संजय राऊतही येत असल्याने मोठा राजकीय निर्णय होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यापूर्वीही शरद पवारांना भेटलेले आहेत. आता आज भाजप आणि शिवसेनेतील वाद पाहिल्यानंतर या भेटली महत्त्व आले आहे. त्यामुळे राज्यात नवी राजकीय समीकरण उदयास येतंय की काय असा प्रश्न आहे.

खोटा रिश्ता ठेवायचा नाही; उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील A टू Z मुद्दे

राज्याच्या राजकारणात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रस्थानी आले आहेत. कारणही तसेच आहे, काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले असून, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोठ्या भावाचं लहान भावानं ऐकायला हवं- मुनगंटीवार

भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम असताना दोन्ही पक्ष एकत्र आल्याने आजही पाहायला मिळाले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्ही चुकीच्या लोकांसोबत गेल्याचे दुःख असल्याचे  म्हटले आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही बोलले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा तिढा पवारांच्या मदतीने सुटणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

loading image