esakal | मोठ्या भावाचं लहान भावानं ऐकायला हवं- मुनगंटीवार
sakal

बोलून बातमी शोधा

Sudhir Munganthiwar speak after Uddhav Thackreay Press Conference

नरेंद्र मोदी मेरे बडे भाई है असे उद्धव ठाकरे म्हणत असले तरीही मोठ्या भावा बाबत मन दूषित करण्याचे काम कोण करते याचा शोध उद्धव ठाकरे यांनी घ्यावा आणि मोठ्या भावाचं लहान भावानं काही गोष्टी ऐकायला हव्यात, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.

मोठ्या भावाचं लहान भावानं ऐकायला हवं- मुनगंटीवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नरेंद्र मोदी मेरे बडे भाई है असे उद्धव ठाकरे म्हणत असले तरीही मोठ्या भावा बाबत मन दूषित करण्याचे काम कोण करते याचा शोध उद्धव ठाकरे यांनी घ्यावा आणि मोठ्या भावाचं लहान भावानं काही गोष्टी ऐकायला हव्यात, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.

'राष्ट्रवादीच्या आमदारांना उदयनराजेंचा फोटो मेसेज करुन ठेवलाय'

मुनगंटीवार म्हणाले,' भाजपला खोटे ठरविण्या आगोदर विचार करायला हवा, जनादेश हा जनतेची सेवा करण्यासाठी होता. मोदीजी अमित शहा यांच्यावर मित्र पक्षांनी कधीही टीका केली नाही. आम्हाला कोणताही खोटारडेपणा करायचा नाही. आम्हाला विकासाचे उन्नतीचे कार्य करायचे आहे. राम मंदिर आमच्यासाठी कायम महत्वाचे असून प्रभू रामचंद्राच्या तत्वारच आम्हाला राज्य करायचे आहे.

राजकीय भूकंप होणार? काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला

समझोता करतच मुंबई महापालिकेत भाजपने कुठलेही पद घेतले नाही. लोकांची सेवा करण्यासाठीच आम्हाला सत्ता हवी असल्याचेही मुनगंटीवार यांनी केले आहे.  निवडणुकीच्या निकाला नंतर कोणतीही चर्चा न करता आम्हाला इतर पार्याय खुले आहेत ही घोषणा सेनेने केली ही चूक कोणाची आहे आणि मार्ग कोणी बंद केले यावर विचार व्हावा असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top