Santosh Deshmukh : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर पद्धतीनं झालेल्या हत्या प्रकरणाची कबुली तिन्ही प्रमुख आरोपींनी दिली आहे. त्यामुळं या प्रकरणातील ही सर्वात मोठी बातमी आहे. यानंतर आता पुढील हालचालींना वेग येणार आहे. .Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड यानेच केले मार्गदर्शन; सरपंच हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांनी मांडला घटनाक्रम.सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि मास्टरमाईंड आहेत. हे तिघेही सध्या एसआयटीच्या ताब्यात आहेत. या तिघांनी आपण संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. यामध्ये सुदर्शन घुले यानं सांगितलं की, देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. कालच यासंदर्भात बीडच्या सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. वाल्मिक कराड यानंच या तिघांना हत्येसाठी मार्गदर्शन केल्याचं त्यांनी कोर्टासमोर युक्तीवाद करताना सांगितलं होतं. .Santosh Deshmukh Murder : "योग्य ती कागदपत्र न मिळाल्याने आरोप निश्चिती करु नका" संतोष देशमुख प्रकरणात आरोपींच्या वकिलांची मागणी.दरम्यान, हे प्रकरण सातत्यानं लावून धरणारे आमदार सुरेश धस यांनी आरोपींच्या या कुबलीजबाबावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, "संतोष देखमुखांच्या खुनाच्या आधीचे दोन दिवस आणि नंतरचे दोन दिवस काय घडामोडी घडल्या? यामध्ये आणखी काही आरोपी आहेत का? याची चौकशी देखील एसआयटीनं केली पाहिजे. तसंच आरोपींच्या या कबुली जबाबामागे काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? याबाबत एसआयटीला पत्र लिहिणार आहोत तसंच मीडियाशी याबाबत बोलणार नाही, असंही धस यांनी म्हटलं आहे. .Santosh Deshmukh Case: कृष्णा आंधळेने कराडला केले होते तीन फोन; देशमुख प्रकरणात महत्त्वाची माहिती, निकम नेमकं काय म्हणाले?."या प्रकरणातील ही खरोखरच महत्वाची अपडेट आहे. त्यामुळं आपल्याला आरोपी तर कळले पण आता त्यांना या गुन्ह्यात ओढणार कोण आहे? हे देखील समोर येणं गरजेचं आहे", अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.