

Santosh Deshmukh Case
esakal
Krishna Andhale Absconding Accused : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड जिल्हा विशेष मोक्का सत्र न्यायालयात पार पडली. या सुनावणीत अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या असून फरार आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या सहा महिन्यांत तीन वेळा आपल्या गावी येऊन गेल्याचा गंभीर दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. तसेच देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.