
Valmik Karad Police Custody News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी झाली. यावेळी मोक्का लावण्यात आलेला आरोपी वाल्मिक कराड याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, सीआयडीनं कोर्टात मोठा दावा केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असून ही हत्या का करण्यात आली? याचा दावाही एसआयटीनं कोर्टात केला.