sarkarnama.in : विशेष बातम्या

sarkarnama
बुधवार, 26 एप्रिल 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

जनता दरबारात ऊर्जामंत्र्यांचा रुद्रावतार 
शेतकऱ्यांच्या वीज जोडणीसह ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यास अपयशी ठरलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच भडकले. बुलडाणा येथे आयोजित जनता दरबारात ऊर्जामंत्र्यांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची घाबरगुंडी उडाली.
पूर्ण बातमी इथे वाचा

 

मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात उसळली गर्दी
कधी नव्हे ते मंत्रीमंडळ बैठकीच्या निमित्ताने मंत्रालयात आलेल्या मंत्र्यांना भेटण्यासाठी सामान्य जनतेची मोठी गर्दी उसळली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीदरम्यानच मंत्री मंत्रालयात असतात,  याची माहिती सामान्य लोकांनाही माहित झाल्यामुळे आपली कामे घेऊन अनेकजण मंत्रालयात आले होते.
पूर्ण बातमी इथे वाचा

प्रत्येक जिल्ह्‌यात डॉक्‍टरांचा होणार सुकाळ
डॉक्‍टरांची संख्या वाढविणे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर नवीन आरोग्य विज्ञान महाविद्यालयांची स्थापना करणे हा एकच पर्याय असल्याने त्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याने येत्या काळात डॉक्‍टरांची संख्या मोठ्‌या प्रमाणावर वाढणार आहेत
पूर्ण बातमी इथे वाचा

शिक्षण सचिव शिक्षक आमदारांच्या हिटलिस्टवर
 राज्यातील शालेय शिक्षण विभागातील अनागोंदीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार हेच जबाबदार असल्याने त्यांचे तातडीने निलंबन करावे, यामागणीसाठी भाजपासह इतर पक्षाच्या आमदारांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागील दोन महिन्यांपासून अनेकदा निवेदनही या आमदारांनी दिले आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

सरकारला तूर खरेदीचे निर्देश द्यावेत, न्यायालयात याचिका
मराठवाड्यासह राज्यातील शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्याच्या तूर खरेदीचे निर्देश सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. यावर येत्या 2 मे रोजी सुनावणी होणार आहे. मराठवाड्यातील तूर खरेदी केंद्रांवर 4 लाख 60 हजार क्विंटल एवढ्या तुरीची नोंदणी झाल्यावरही 5 ते 7 लाख क्विंटल तूर शेतकऱ्यांकडे शिल्लक राहते. 
पूर्ण बातमी इथे वाचा

 

सरकारनामा ट्विटर

 

 

Web Title: sarkarnama news bulletin

टॅग्स