sarkarnama.in : विशेष बातम्या

सरकारनामा
गुरुवार, 29 जून 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

अकोल्यात भाजपमधले मतभेद उफाळले, महापौरांवर स्वपक्षीयांचीच तीव्र टीका
गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भारतीय जनता पक्षात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण पुन्हा एकदा उफाळून आले आहे. महापालिकेच्या सत्तासंघर्षात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केल्याचे नेहमीच पहावयास मिळते.
पूर्ण बातमी इथे वाचा

मध्यावधीच्या शक्‍यतेने शिवसेना "सावध" 
राज्यात सध्या मध्यावधीच्या चर्चेचे वारे जोरात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडून मध्यवधीच्या सुरू असलेल्या हालचाली पाहून शिवसेनेही सावध होत पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पर्व विदर्भाची दौरा संपवून मराठवाड्याकडे कुच केल्याचे समजते. 
पूर्ण बातमी इथे वाचा

राज ठाकरेंकडून मनसेतील  बड्या नेत्यांना झटके 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या संघटनात्मक फेरबदलाच्या बैठकांचे नियोजित वेळापत्रक पूर्ण होण्यापूर्वीच पक्षातील बड्या नेत्यांना झटके देण्यास सुरुवात केली असून त्यांनी भायखळा आणि शिवडी या विभागांच्या विभागाध्यक्षपदावरून पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या समर्थकांची उचलबांगडी करत नव्या विभागाध्यक्षांच्या नियुक्‍त्या केल्या. 
पूर्ण बातमी इथे वाचा

माळीणगाव सरकारच्या भ्रष्टाचाराचे  पारदर्शक उदाहरण : सचिन सावंत 
सरकारने पुनर्वसन केलेल्या माळीणगावाची पहिल्याच पावसात झालेली दुर्दशा हे राज्यातील फडणवीस सरकारच्या भ्रष्ट आणि निष्काळजी कारभाराचे पारदर्शक उदाहरण आहे; अशी टीका प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली. 
पूर्ण बातमी इथे वाचा

काँग्रेसला सरकसट कर्जमाफीच हवी : अशोक चव्हाण 
कर्जमाफीप्रकरणी राज्य सरकारची भूमिका दररोज बदलत आहे. आज एक भूमिका तर उद्या एक असा प्रकार सुरु असल्याने सरकार कर्जमाफीच्या भूमिकेवर ठाम भूमिका घेत नसल्याचे पहावयास मिळत आहे. सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया किचकट करून ठेवले असून दररोज निकष बदलत आहेत. 
पूर्ण बातमी इथे वाचा

सरकारनामा ट्विटर​

Web Title: sarkarnama news bulletin

टॅग्स