sarkarnama.in : विशेष बातम्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

शेतकऱ्यांच्या आडून विरोधकांचा  संप चिघळविण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री 
शेतकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी दगडफेक झाली आहे. यामागेही कोण आहेत हे आम्हाला माहित आहे असे स्पष्ट करताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देता येणार नाही असा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. 

रावसाहेब दानवेंचा आवाज बसला 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा आवाज बसला आहे. त्यांच्यावर गेल्या महिन्यात फार टीका झाल्यामुळे नव्हे तर त्यांचा आवाज वैद्यकीयदृष्ट्या बसला आहे. ते फारसे बोलू शकत नाहीत. 

सांगलीचा राजवाडा राजांचा नव्हे, सरकारचाच!
सांगली संस्थानची ओळख असलेला राजवाडा व परिसर हा विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या मालकीचा नसून त्याची मालकी महाराष्ट्र शासनाकडे आहे. 

मुख्यमंत्र्यांनीही आता बेसन भाकरच खावी - बच्चू कडू
भाजीपाला आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ तीन दिवस संप कायम ठेवला तरी सरकारला त्याचा परिणाम दिसून येईल. मुख्यमंत्र्यांनीही आता बेसन भाकरच खावी, गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाणारा भाजीपालाही थांबवू, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या संपाचा 'मराठा मोर्चा' होईल? 
एखाद्या लाटेचा अंदाज वर्तविणे आजकाल अवघड झाले आहे. 2014 च्या निवडणुकीत मोदी प्रचंड बहुमताने निवडून येतील, मराठ्यांचे लाखोंचे मोर्चे जिल्हानिहाय निघतील आणि शेतकरी संपाला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळेल, याचा अंदाज कोणीच व्यक्त केला नव्हता.

Web Title: sarkarnama news bulletin maharashtra political news