sarkarnama.in : विशेष बातम्या

टीम सरकारनामा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

पंकजांच्या गृहखात्याच्या आवडीने मुख्यमंत्री दुखावणार?
मंत्रिमंडळातील गृहखातं आपलं आवडतं खातं आहे, असे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी  केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्या विरोधातील भाजपमधील अंतर्गत}धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री दुखावले जाण्याची शक्यता आहे.

पूर्ण बातमी इथे वाचा

मंत्रालयात मंत्र्यांचाच दुष्काळ
मुंबई : विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून कॅबिनेट आणि राज्य मंत्र्यांपैकी अनेकांनी मंत्रालयातील कामकाजाऐवजी आपआपल्या मतदार संघातच अधिक वेळ घालविण्यात दंग आहेत. मतदारसंघातच मंत्री दंग असल्याने त्यांचे राज्यातील प्रश्‍नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र मंत्रालयात निर्माण झाले आहे.आपल्या कामासाठी आलेल्या असंख्य नागरिकांना मंत्रालयात अनेकदा खेटे मारूनही मंत्री भेटत नाहीत, अशा स्थितीत मंत्रालयात मंत्र्यांचा दुष्काळ पडला की, काय असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 

पूर्ण बातमी इथे वाचा

मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर ठरेल : जानकर
मुंबई : केंद्र शासनाच्या ‘नीलक्रांती’ धोरणांतर्गत राज्यातील मत्स्य व्यावसायिक, मत्स्यशेती करणा-या व्यक्ती व उद्योजक यांच्या सहयोगाने राज्यातील भू-जलाशयीन, सागरी व निमखारे पाणी क्षेत्रातील नैसर्गिक साधन संपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करुन शाश्वत पध्दतीने, जैविक सुरक्षितता व पर्यावरणीय समतोल राखून मत्स्योत्पादन घेण्याचे राज्य शासनाचे नियोजन व प्रयत्न आहे. त्यामुळे मत्स्योत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर ठरेल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी केले. मुंबईलगतच्या मासेमारी होणा-या समुद्री क्षेत्रात जानकर यांनी बोटीने फिरुन या क्षेत्रात मासेमारी करणा-या व्यक्तींची, मच्छीमार सहकारी संस्थांच्या सदस्यांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 

पूर्ण बातमी इथे वाचा

कोल्हापुरात उपक्रम: शासकीय कार्यालये उजळणार सौरउर्जेने 
कोल्हापूर : विजेची वाढती मागणी व त्या तुलनेत होणारा कमी पुरवठा यावर मार्ग काढण्यासाठी सौरऊर्जा वापराचा पर्याय पुढे येत आहे. प्रशासनाचे प्रमुख कार्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, शिवाजी विद्यापीठ, महापालिका व वनविभागाच्या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील हा प्रकल्प येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

पूर्ण बातमी इथे वाचा

मोदी, योगींनी निराधार महिलांसाठी योजना आणावी- ओवेसी
लातूर : मुस्लिम महिलांच्या तीन तलाकवर बोलणाऱ्या पंतप्रधान मोदी व योगींनी देशातील चार कोटी निराधार महिलांसाठी एखादी चांगली योजना आणावी अशी मागणी एमआयएमचे खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी लातूर येथील महापालिकेच्या प्रचार सभेत बोलताना केली. 

पूर्ण बातमी इथे वाचा

Web Title: sarkarnama.in news bulletin of 17 April