Sarpanch: आता एका क्लिकवर कळेल तुमच्या सरपंचाने पैसे खाल्ले का? या ऑनलाइन प्रोसेसने घरी बसवा भ्रष्टाचारी पुढारी

Gram Panchayat: राज्यात आपण असे अनेक सरपंच पाहिले आहेत, ज्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या गावांचा कायापालट करत राज्याच्या नकाशावर गावाचे नाव झळकावले आहे.
Sarpanch|Gram Panchayat
Sarpanch|Gram PanchayatEsakal

राज्यासह देशाच्या राजकारणात आपण अशे अनेक नेते पाहिले आहेत. ज्यांनी सरपंचपदापासून आपली राजकीय कारकिर्द सुरू करत केंद्रीय मंत्र्यापर्यंत झेप घेतली आहे. गावच्या राजकारणा ग्रामपंचायतील खूप मोठे महत्त्व आहे. त्यामुळे अनेक पुढारी ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी जीवाचे रान करत असतात.

दरम्यान, गावच्या विकासासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मोठा निधी येत असतो. हा निधी सरपंचाच्या अधिकृत खात्यावर येत असतो. आणि त्याद्वारे गावातील विकास कामे होत असतात.

राज्यात आपण असे अनेक सरपंच पाहिले आहेत, ज्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या गावांचा कायापालट करत राज्याच्या नकाशावर गावाचे नाव झळकावले आहे. पण असेही अनेक सरपंच आहेत, ज्यांनी फक्त कागदावरच विकास कामे करत सरकारच्या पैशावर डल्ला मारला आहे.

या सर्वांत आज इंटरनेटमुळे अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. यातून प्रत्येक नागरिक आपल्या गावाला किती निधी मंजूर झाला आहे, त्यापैकी किती निधी खर्च झाला आहे याची मिळवू शकतो. याचबरोबर विकास कामे न होता, जर मंजूर झालेला निधी खर्च झाला असेल आणि काम झाले नसले तर तुम्ही सरपंचाची तक्रार करू शकता. या तक्रारीतून सरपंचाने विकास कामांच्या निधीत भ्रष्टाचार केला असेल तर त्याची हाकालपट्टीही होऊ शकते.

Sarpanch|Gram Panchayat
Supriya Sule:"घर फोडण्यापेक्षा..."; पुणे शहरातील प्रश्नांवरुन सुळेंची भाजपवर टीका

गावाला किती निधी मंजूर झाला, जाणून घेण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • प्रथम egramswaraj च्या अधिकृत संकेतस्थळावर जावा.

  • स्क्रोल केल्यावर प्लॅनिंग हा पर्याय दिसेल.

  • त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर रिपोर्टिंग पर्यायावर टॅप करा.

  • येथे ग्रामपंचायत-निहाय खर्च अहवाल पर्याय हा दिसल्यानंतर त्यावर क्लिक करा.

  • यानंतर एक नवे पेज ओपन होईल जिथे ज्या आर्थिक वर्षाची माहिती हवी आहे ते भरा.

  • पुढे राज्य, कॅटेगरी, सब कॅटेगरी टाका.

  • यानंतर कॅप्चा कोड टाका.

  • त्यानंतर गेट रिपोर्ट पर्यायावर टॅप करा.

  • यानंतर तुमचा गट जाणून घेऊन गाव शोधाल्यानंतर तुमच्या गावात किती विकास निधी मंजूर झाला आहे आणि त्यातील किती निधी खर्च झाला हे कळेल.

eGramswaraj
eGramswarajEsakal
Sarpanch|Gram Panchayat
Uddhav Thackeray: "कष्ट ठाकरेंचे फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीचा," महाविकास आघाडीत चंद्रकांत पाटलांनी टाकली ठिणगी

वरील प्रोसेस फॉलो करून तुमच्या गावाला मिळालेल्या विकास निधीचा खर्च होऊनही, गावात कामे झाली नसतील तर तुम्ही Meri Panchayat या ॲपवर लॉगइन करून तुमच्या सरपंचाची तक्रार करू शकता. तुम्ही केलेल्या तक्रारीनंतर त्याची दखल घेत सरपंचाची चौकशी केली जाईल. यामध्ये सरपंच दोषी आढळला तर त्याचे सरपंचपदही जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com