Supriya Sule:"घर फोडण्यापेक्षा..."; पुणे शहरातील प्रश्नांवरुन सुळेंची भाजपवर टीका

सुप्रिया सुळे यांनी केली एसआयटीची मागणी
 घर फोडण्यापेक्षा... पुणे प्रश्नांवरुन सुळेंची भाजपवर टीका
Supriya Sule pune rain sakal

Supriya Sule News: शहरात पाऊस पडल्यानंतर अनेक दुकानांमध्ये पाणी घुसले, नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ५० नाले वळविले गेले असल्याने शहरात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

याची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. गेल्या १० वर्षात पुणे स्मार्ट झाले नाही तर उलट समस्या वाढल्या आहेत. घर फोडणे, इडी, आयटीच्या छापे टाकणे हे करण्यापेक्षा पुण्याकडे लक्ष द्या अशी शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली.(maharasthra News)

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यापार्श्‍वभूमीवर आज (ता. ११) सुप्रिया सुळे यांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर महापालिकेत आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सुळे म्हणाल्या, ‘‘ पुण्यात प्रचंड पाऊस होऊन नुकसान झाले आहे. नाले बंद असल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते, चेंबरच्या जाळ्यावर सिमेंट, डांबर टाकून बंद केल्या आहेत. विकास कामे घाईने करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे हे हाल झाले आहेत. शहरातील ५० नाल्यांचा प्रवाह वळविल्यामुळे नुकसान झाले. रस्त्यांची रचना चुकीच्या पद्धतीने केल्याने पाणी वाहून न जात रस्ते तुंबत आहेत.

महापालिका प्रशासनाला पाणी निचरा होण्याची ठिकाणे सापडत नाहीत, पण सिंहगड रस्त्यावर आमच्या कार्यकर्त्यांनी शोधून दाखवली आहेत.

 घर फोडण्यापेक्षा... पुणे प्रश्नांवरुन सुळेंची भाजपवर टीका
Pune Rain : पावसाळी वाहिन्या केबलच्या विळख्यात;महापालिका प्रशासनाकडून अखेर कारवाई सुरू

नाले सफाई, पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी ११ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या गेल्या आहेत. हा पैसे कुठे गेला ? हे काम करणारे ठेकेदार कोण आहेत, त्यांच्यावर महापालिका प्रशासन का कारवाई करत नाही असा प्रश्‍न उपस्थित करत सुळे यांनी याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी अशी मागणी राज्य सरकारकडे करणार आहे.

सर्व वाईट पुण्यातच का ?

पुणे शहरात ड्रग्ज सापडतात, ससून रुग्णालयातून आरोपी पळून जातात, गुन्हेगारी वाढत आहे, पोर्शे गाडीचा अपघात करून दोघांच्या बळी घेणाऱ्याच्या रक्ताची अदलाबदली होते, मुसळधार पाऊस पडला की लगेच पुण्यात पाणी तुंबते. अशा वाईट घटना सगळ्या पुण्यातच का घडत आहेत?. पुण्याकडे कोणी तरी लक्ष दिले पाहिजे, फक्त प्रशासनावर सोडून जमणार नाही, त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मागणी करणार आहे. आम्ही महापालिकेला कर भरतो, तर आमचा पैसा कुठे जातो हे पुणेकरांना कळायला हवे.

 घर फोडण्यापेक्षा... पुणे प्रश्नांवरुन सुळेंची भाजपवर टीका
Pune News: पाथर्डी - मुंबई बस अपघातात एसटी चालकाचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com