एका म्हशीने अख्ख्या गावाला रडवलं; 32 व्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरु होती, पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara news

एका म्हशीने अख्ख्या गावाला रडवलं; 32 व्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरु होती, पण...

साताराः आजकाल माणसं माणसांना विचारायला तयार नाहीत. एखाद्याला मदत करुनही तो फारकाही उपकार ठेवत नाही. पण साताऱ्यातल्या एका कुटुंबाने एका म्हशीच्या उपकारांची ३२ वर्षे जाण ठेवली.

३२ वर्षांपूर्वी एका म्हशीमुळे या कुटुंबाचा काळ बदलला. कुटुंबाची परिस्थिती बदलली. मात्र त्या कुटुंबाने म्हशीचे उपकार विसरले नाहीत. दरवर्षी म्हशीचा वाढदिवस थाटामाटात आणि धुमधडाक्यात साजरा केला जाई. यावर्षीही जय्यत तयारी सुरु होती... परंतु काळाच्या मनात वेगळंच काहीतरी होतं.

हेही वाचाः सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

सातारा जिल्ह्यातला कोरेगाव तालुका आणि धामनेर गाव. या गावातल्या क्षीरसागर कुटुंबाची ही कहाणी आहे. संतोष क्षीरसागर यांच्या कुटुंबाकडे राणीलक्ष्मी नावाच म्हैस होती. १६ जानेवारी रोजी या म्हशीचा वाढदिवस साजरा केला जातो. बॅनर, फटाके आणि अन्नदान करुन हा सोहळा पार पडतो. मागील ३१ वर्षांपासून हेच सुरुय.

यावेळी मात्र गावावर शोककळा पसरली आहे. राणीलक्ष्णीच्या वाढदिवसाची तयारी सुरु असतांना म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. धामनेर गावावर शोककळा पसरली आहे. म्हशीमुळे कुटुंबाचा कायापालट झाला होता. मात्र म्हशीच्या मृत्यूने कुटुंब हुंदके देत रडत होतं. म्हशीच्या मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा: Weather Update : फक्त थंडीच नाही तर पाऊसही येणार; हवामान विभागाचा अंदाज

मागच्या वर्षी म्हशीचे डोळे पानावले

मागच्या वर्षी १६ जानेवारील राणीलक्ष्मीचा ३१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. गावात बॅनर लावून आणि अन्नदानाचा कार्यक्रम ठेवून जल्लोष साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे केकही कापण्यात आला. यावेळी म्हशीच्या डोळ्यातही पाणी तरळलं होतं. बातमीसाठी वापरलेला तोच फोटो आहे.

टॅग्स :SataraBuffaloes