पक्षाने संधी दिल्यास राष्ट्रवादी मोडीत काढू - शंभूराज देसाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सातारा -  ""मी स्वाभिमानी असून, मला कोणतीही गोष्ट मागायला आवडत नाही. आमच्या पक्षात आदेश मानला जातो. त्यामुळे पक्ष प्रमुखांनी संधी देण्याची वाट पाहात आहे. संधी मिळाल्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादीची एकाधिकारशाही मोडीत काढली जाईल, असे स्पष्ट मत आमदार शंभूराज देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

सातारा -  ""मी स्वाभिमानी असून, मला कोणतीही गोष्ट मागायला आवडत नाही. आमच्या पक्षात आदेश मानला जातो. त्यामुळे पक्ष प्रमुखांनी संधी देण्याची वाट पाहात आहे. संधी मिळाल्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादीची एकाधिकारशाही मोडीत काढली जाईल, असे स्पष्ट मत आमदार शंभूराज देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

मंत्रिमंडळाच्या विस्तारात तुमच्या नावाचा समावेश असेल का, या प्रश्‍नावर शंभूराज म्हणाले, ""आमच्या पक्षात कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आदेश मानला जातो. मी स्वाभिमानी, सुसंस्कृत व संयमी नेतृत्व म्हणून परिचित आहे. मला कोणतीही गोष्ट मागायला आवडत नाही. त्यामुळे माझे काम पाहून पक्ष प्रमुखांनी संधी देण्याची वाट पाहात आहे. योग्य वेळी निर्णय होईल, असे वाटते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे सख्य असल्याने ठाकरेंनी मला पक्षाच्या आमदारांची रखडलेली कामे मार्गी लावण्याची विशेष जबाबदारी दिली होती. ती मी यशस्वीपणे पार पाडली आहे. पक्ष प्रमुखांनी संधी दिल्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादीची एकाधिकारशाही मोडीत काढली जाईल. पाटण तालुक्‍यात राष्ट्रवादीला यश मिळणार नाही, हे त्रिवार सत्य आहे.'' 

पालकमंत्री विजय शिवतारेंच्या कामांविषयी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत नाराजी आहे, या विषयी विचारले असता ते म्हणाले, ""पालकमंत्र्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे यापुढेही चांगले काम होईल.'' नारायण राणेंच्या भाजप प्रवेशामुळे फरक पडेल असे वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

उदयनराजेंची मदत झाली नाही 
नियोजन समितीच्या निवडणुकीत तुमचे गणित कुठे चुकले, यावर आमदार देसाई म्हणाले, ""आमचे खासदार उदयनराजेंसोबत एकमेकांना मदत करण्याचे ठरले होते; पण त्यांच्याकडून मदत झाली नाही. नेमकी कुठे गडबड झाली हेच समजले नाही. छत्रपती घराण्याविषयी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांना थेट विचारू शकत नाही.'' 

Web Title: satara news mla sambhuraje ncp