लग्नाचा बॅंड वाजवा, 'या' खात्यांची परवानगी घेऊनच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

मंगल कार्यालयात विवाह करण्यासाठी शासनाने काही नियम व अटीवर परवानगी दिली आहे. त्यासाठी विवाह होणाऱ्या स्थानिक पोलिस ठाण्यात अर्ज करून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर तहसील कार्यालयातही अर्ज करावा लागणार आहे.
 

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शासनाने 50 लोकांच्या मर्यादेत सामाजिक अंतर पाळून लग्न समारंभांना परवानगी दिली होती; पण कोणत्या ठिकाणी लग्न समारंभ करावेत, याबाबत स्पष्टता नव्हती. पावसाळ्यात तोंडावर होणारी लग्न कार्ये लक्षात घेऊन खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, हॉल, सभागृह, घर, घराचा परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत लग्न समारंभ पार पडण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर यांनी सर्व विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
 
मार्च, एप्रिल, मे असे अडीच महिने लॉकडाउन राहिले; पण जूनमध्ये लोकडाउनमध्ये विस्कटलेली आर्थिक घडी पूर्ववत करण्यासाठी लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली. बंदच्या काळात होणारी लग्न कार्य सुरवातीला बंद ठेवली. मात्र, त्यानंतर सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन काही अटी शर्तीवर लग्न कार्ये करण्यास परवानगी दिली. यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखताना गर्दी टाळून केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सामाजिक अंतर पाळून लग्न समारंभ करण्याची परवानगी दिली होती; पण लग्न समारंभ कोणत्या ठिकाणी पार पडतील, याबाबतचा उल्लेख आदेशात नव्हता. त्यामुळे मंगल कार्यालये, सभागृहे, खुले लॉन येथे लग्न समारंभ होत नसल्याने या व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली होती. राज्यातील सर्वच मंगल कार्यालये ओस पडली होती. त्यामुळे लग्न समारंभ मंगल कार्यालयात करण्याबाबतची परवानगी मिळावी, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निवेदने आली होती. 50 लोकांच्या उपस्थित घराच्या परिसरात लग्न समारंभ करणे पावसाळ्यात अडचणीचे होणार होते. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने पावसाळ्याचा विचार करून यापुढे लग्न कार्ये करण्यासाठी खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, हॉल, सभागृहे, घर व घराचा परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सामाजिक अंतराची अट पाळून लग्न समारंभांना परवानगी देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा आदेश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर यांनी काढला आहे. याची माहिती त्यांनी सर्व विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे यापुढे मंगल कार्यालये, हॉल, सभागृहे, खुले लॉन येथे शुभमंगल होणार आहेत. 

परवानगीसाठी हे करा 

मंगल कार्यालयात विवाह करण्यासाठी शासनाने काही नियम व अटीवर परवानगी दिली आहे. त्यासाठी विवाह होणाऱ्या स्थानिक पोलिस ठाण्यात अर्ज करून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर तहसील कार्यालयातही अर्ज करावा लागणार आहे.

वारीबंदीचा निर्णय वारकऱ्यांच्या जिव्हारी : बंडातात्या कऱ्हाडकर
 
पुढच्या बुधवारपासून तूरडाळ 55, तर चणाडाळ 45 रुपये किलो दराने मिळणार 

राहुल गांधींचे ऐकले असते तर देशावर आलेले हे संकट नक्की टळले असते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Permission Granted To Marriage Hall For Ceremony In Maharashtra