विधानपरिषदेसाठीची चक्र फिरवताहेत पृथ्वीराज चव्हाण? ज्येष्ठ नेते उंडाळकरांच्या मुलाच्या नावाची चर्चा
कराड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांची माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सोमवारी (ता.15) उंडाळकर यांच्या सातारा येथील राजविलास या बंगल्यात जाऊन भेट घेतली. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी पहिल्यांदाच उंडाळकर यांची घरी जाऊन भेट घेतल्याने या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून काँग्रेसच्या गोटात चैतन्याचे वातावरण आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे गेल्या अनेक वर्षापासून वैर आहे. मध्यंतरीच्या काही कारणामुळे त्यात आणखी दरी निर्माण झाली होती. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही गटातील संघर्ष संपून दरी कमी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्याला चांगले यश आले. त्यानंतर चव्हाण -उंडाळकर गटाचे मिले सुर मेरा तुम्हारा असे वातावरण मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत दिसून आले. तेथे चव्हाण गटाचे मनोहर शिंदे यांना उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी साथ दिली. त्यामुळे तेथे शिंदे यांना विजय मिळवणे सोपे झाले. मलकापूरचा पॅटर्न काँग्रेसच्या उभारणीसाठी कराड दक्षिणमध्ये राबवण्याची कार्यवाही तेव्हापासून सुरू झाले आहे. दोन्ही गट एकत्र आल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो, हे मलकापूर पालिकेच्या निवडणुकीतून दिसून आले. त्यामुळे चव्हाण गट तेव्हापासून उंडाळकर गटाची फारशी फारकत घेताना दिसून आलेला नाही. विधानसभा निवडणुकीत मतविभागणी टाळण्यासाठी आणि आमदार चव्हाण यांच्या सहकार्यासाठी उदयसिंह पाटील उंडाळकर यांना उमेदवारी दिल्याची मोठी चर्चा सुरू होती. विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उदयसिंह उंडाळकर चव्हाण यांच्या सत्कारासाठी गेले होते. त्यामुळे त्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले.
अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईला रवाना होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री चव्हाण, मंत्री बंटी पाटील यांनी वेळ काढून माजी मंत्री उंडाळकर यांची सातारा येथील त्यांच्या राजविलास या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये जरी उंडाळकर यांच्या तब्येतीची चौकशीचे कारण सांगण्यात येत असले तरी राजकीय विषयावरही चर्चा झाल्याचे खात्रीशिर समजते. अनेक वर्षांनंतर आमदार चव्हाण यांनी पहिल्यांदाच उंडाळकर यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात ही महत्वाची भेट मानली जात आहे. काँग्रेसला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि सातारा जिल्ह्यातील विस्कटलेली काँग्रेसची घडी पुन्हा बसवण्यासाठी ही भेट राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीदरम्यान उदयसिंह पाटील हेही उपस्थित होते. सध्या विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवार निवडीची कार्यवाही सर्वच पक्षाकडून सुरू आहे. काँग्रेसलाही त्यामध्ये जागा मिळणार आहेत. त्यामध्ये ॲड. पाटील यांचे नाव घेतले जाणार का ? या चर्चेला सुरवात झाली आहे. आमदार चव्हाण व मंत्री पाटील यांनी घेतलेल्या भेटीमुळे त्याला पुन्हा दुजोरा मिळाला आहे.
दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार
खदखद राज्य सरकारमध्ये, खलबते कऱ्हाडमध्ये?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.