मिसेस सदावर्तेंना दिलासा तर, सदावर्तेंना 14 दिवसांची कोठडी

सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत.
गुणरत्न सदावर्ते-जयश्री पाटील
गुणरत्न सदावर्ते-जयश्री पाटील

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना (ST Worker Strike) भडकवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadawarte) यांना सातारा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे जयश्री पाटील यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना सातारा सत्र न्यायालयाने आज 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Gunaratna Sadawarte News)

गुणरत्न सदावर्ते-जयश्री पाटील
थोडे मनोरंजन व्हायला नको का ? सुप्रिया सुळे यांची राज यांच्या सभेवर टीका

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तसेच कोल्हापूर आणि सोलापूरच्या छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते हे सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे. तर दुसरीकडे सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापर्यंत त्या न्यायालयाच्या समोर हजर झालेल्या नाही. परंतु, आता मुंबई सत्र न्यायालायाने जयश्री पाटील यांना अटकेपासून दिलासा दिला असून, त्यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

गुणरत्न सदावर्ते-जयश्री पाटील
प्रतीक्षा संपली! 'द काश्मीर फाइल्स' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

चार दिवसांपूर्वीच सदावर्ते यांना सातारा न्यायालयाने पाेलीस काेठडी (police Custody) सुनावली हाेती. त्याची मुदत आज संपत असल्याने पोलिसांनी सदावर्तेंना न्यायालयात हजर केले होते. त्यावर न्यायालयाने सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी घडलेल्या सर्व प्रकरणांची सखोल तपासणी करण्यासाठी सदावर्तेंना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत सदावर्तेंना 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गुणरत्न सदावर्ते-जयश्री पाटील
नाशिकमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन; पाहा Photos

काय आहे प्रकरण?

दोन वर्षांपूर्वी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, ते गैरहजर राहिल्यानं सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज कोर्टानं मंजूर केला होता. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर बीडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com