
थोडे मनोरंजन व्हायला नको का ? सुप्रिया सुळे यांची राज यांच्या सभेवर टीका
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये येत्या १ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेवरुन राजकीय वातावरण तापले आहे. या सभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, या सभेला फार महत्त्व देऊ नका. तो येईल भाषण करुन जाईल. तुम्ही तुमचे काम करा. सुळे या आज सोमवारी (ता.१८) औरंगाबाद (Aurangabad) येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. थोडं एंटरटेंमेन्ट पण होऊ द्या. दररोज दूरदर्शन का पाहायचे? किती दिवस गंभीर चित्रपट पाहाणार, थोडे मनोरंजन व्हायला नको का? अशी टीका सुळे यांनी ठाकरे यांच्या सभेवर केली. (Supriya Sule Attacks On Raj Thackeray For His Assembly In Aurangabad)
हेही वाचा: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे खरंच मनापासून कौतुक ! : प्रीतम मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या सभेला महत्त्व देऊ नये, असे आवाहन करित त्यांनी मनोरंजन म्हणून त्याकडे पाहावे, असा सल्ला उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. पुढे सुळे म्हणाल्या, राज ठाकरे (Raj Thackeray) येतील. भाषण करुन निघून जातील. तुम्ही ताण का घेता? तुमचे काम करा.
हेही वाचा: शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या
राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत औरंगाबादेत १ मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले. मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहे. हे लक्षात ठेवून राज हे आपले मार्गक्रमण करताना दिसत आहेत. राज ठाकरे यांना ऐकायला लोक येतात. मात्र त्यांना कोणीच मत देत नाही. ठाकरेंच्या सभेने शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादेत होणाऱ्या सभेवर प्रतिक्रिया दिली.
Web Title: Supriya Sule Attacks On Raj Thackeray For His Assembly In Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..