
Satara News: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये शिक्षणासाठी गेलेली कराड तालुक्यातील उंब्रजची नीलम तानाजी शिंदे ही तरुणी भीषण अपघातामुळं कोमात आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी कुटुंबीयांची परवानगी आवश्यक असल्याने तिच्या वडिलांनी अमेरिकेच्या व्हिसासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली होती. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर अखेर नीलमच्या वडिलांना व्हिसा मिळाला आहे.