चंद्रकांतदादांच्या आव्हानाला सतेज पाटलांचे सडेतोड उत्तर, म्हणाले...

कोल्हापूरसाठी काँग्रेसने काय केले असे चंद्रकांतदादांनी विचारताच पालकमंत्र्यांचे उत्तर
Chandrkant Patil ,Satej Patil
Chandrkant Patil ,Satej PatilEsakal

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil ) यांनी दिलेले आव्हान पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी स्विकारले आहे. गेल्या पन्नास वर्षांत काँग्रेसने काय केले हे जाहीरपणे बिंदू चौकात येऊन सांगू असेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच आहेत. या निवडणूकीला आता वेगळाच रंग चढत आहे.

राज्यात ५० वर्षे काँग्रेसची सत्ता होती. कोल्हापूरसाठी काँग्रेसने काय केले, याचा हिशोब बिंदू चौकात जाहीरपणे द्या असे आव्हान चंद्रकांतदादांनी २३ मार्च रोजी सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सभेत बोलताना केले होते. यानंतर पाईपलाईन आणि शहराची हद्दवाढ, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम अशा अनेक मुद्यावरून सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पालकमंत्र्यांनीही याला सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पाटील यांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी कटवडा, मिसळ पे चर्चाच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधताना सतेज पाटील म्हणाले, कॉंग्रेसने ५० वर्षात काय केले हे सांगायला बिंदू चौकात येऊन चर्चा करण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. कोण किती विकास केला यावर कधीही चर्चा करायला मी तयार आहे. तुम्ही ५ वर्षे काम केले असते तर मतदारसंघ सोडून पुण्याला जाण्याची लाजिरवाणी वेळ आली नसती. जयश्री ताईंनी नगरसेविका म्हणून काम करत असताना ८ कोटी रुपयांची विकासात्मक कामे केली आहेत. कोल्हापूरच्या विकासाचे आण्णांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ताराराणींच्या नगरीतील पहिली महिला आमदार म्हणून जयश्री ताईंना आपण प्रचंड मतांनी विजयी कराल असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com