Satyajeet Tambe Sudhir Tambe
Satyajeet Tambe Sudhir TambeSakal

Satyajeet Tambe : तांबेंची अनोखी शपथ अन् वडिलांनी व्यक्त केला विश्वास; सुधीर तांबे म्हणाले,...

काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी आज आमदारकीची शपथ घेतली.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी होत आहेत. पदवीधर निवडणुकीच्या गोंधळानंतर काँग्रेस नेते सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. त्यांनी आज आमदारकीची शपथ घेतली.

या शपथविधीनंतर त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी त्यांचं कौतुक करणारं एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये सुधीर तांबे म्हणतात, "छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना वंदन करून सत्यजीतने आज विधानपरिषद सदस्यपदाची शपथ घेतली. मला विश्वास आहे की, सत्यजीत या पदाला योग्य न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. सत्यजीत, तुला पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा!"

Satyajeet Tambe Sudhir Tambe
Satyajeet Tambe: "दुसरे दादा सत्यजीत दादा"; शपथविधीवेळी तांबेंच्या समर्थकांची घोषणाबाजी

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. सत्यजित तांबेंनी या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून अर्ज न भरता अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली. पण तरीही या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे भरघोस मतांनी निवडून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com