Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे नेमके कुणाचे उमेदवार? भाजपकडेही मागणार मदत

Satyajeet-Tambe
Satyajeet-Tambeesakal
Updated on

नाशिकः नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे सध्या सबंध राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. ऐनवेळी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वांच्याच नजरा नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे लागून राहिल्या आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ऐन रंगात आलेली आहे. काँग्रेसने सत्यजीत तांबे यांच्या वडिलांना उमेदवारी जाहीर केली परंतु त्यांनी शेवटपर्यंत अर्ज भरला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचाः गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सत्यजीत तांबे यांना भाजपने ए.बी. फॉर्म दिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यासंबंधी तांबेंना प्रश्न विचारला असता त्यांनी नकार दिला. तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला काँग्रेस पक्षाचा ए.बी. फॉर्म मिळाला नसल्याचं तांबेंनी सांगितलं.

Satyajeet-Tambe
Graduate Constituency Election: सत्यजीत तांबेंची खेळी; भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

पुढे बोलतांना सत्यजीत तांबे म्हणाले की, मी काँग्रेसचाच उमेदवार आहे. तरीही भाजपची मदत मिळावी म्हणून मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करणार आहे. आपली राजकीय परंपरा प्रगल्भ आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या जागा आपल्याकडे बिनविरोध होतात. त्यामुळे भाजपची मदत मिळेल, असं तांबे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देऊनही त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे विखे पाटलांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देऊ, असं मत व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

BJP Fields Three Aspirants as Ardhapur DCC Bank Election Race Heats Up
Supreme Court on Rajya Sabha Nomination meenakshi natarajan
Chhatrapati Sambhajinagar
APMC Scrutiny Sweep: 33 Applications Rejected Leaving 267 Candidates in Shirur Fray
Marathi News Esakal
www.esakal.com