Satyajeet Tambe: ...तर विषय क्लोज झाला असता, तांबेंच्या उमेदवारीवर अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

राज्यात विजयी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि कॉंग्रेस यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे.
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe
Updated on

नाशिक पदवीधर निवडणुक पार पडली असली तरी राज्यात विजयी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि कॉंग्रेस यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे. विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसवर अनेक आरोप केले. काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचं षडयंत्र रचलं गेलं असा आरोप तांबे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी तांबेंच्या उमेदवारीवर स्पष्ट भूमिका व्यक्त केली. (Satyajeet Tambe MLC polls from Nashik Ashok Chavan congress maharashtra politics )

काय म्हणाल अशोक चव्हाण?

सत्यजीत तांबेंना काँग्रेस पक्षाच्या बाहेर ढकलण्याचा प्रश्न येतो कुठं. तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून लढायचं होतं, तर कोणी नाकारलं होतं. डॉ. सुधीर तांबे हे विद्यमान आमदार होते. वडिलांच्या जागी मला उमेदवारी द्या, म्हटलं असतं कोणीच विरोध केला नसता.

Pune Bypoll Election: पुणे पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठ वक्तव्य

पण, पक्षश्रेष्ठींनी सुधीर तांबेंच्या नावाला संमती दिल्यावर, अचानक उमेदवारी मागणं हा बदल शक्य नाही. त्यामुळे सुरुवातीलाच उमेदवारी मागितली असती, तर विषय झाला नसता.

“सत्यजीत तांबेंना अपक्ष लढायचं होतं, तर सांगायला हवं होतं. कारण, समोर विरोधक भाजपा आहे. त्यामुळे आपल्यात कोणतेही संदिग्ध वातावरण राहणं योग्य नाही. पारदर्शकता राहिली असती, तर संदिग्धता टाळता आली असती.

नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत जे काही घडलं ते योग्य नाही. कारण, हा मतदारसंघ काँग्रेसचा होता. मात्र, निवडणूक लढण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कळवावं लागतं. राज्यातून दिल्लीत प्रस्ताव गेल्यावर काँग्रेस अध्यक्ष त्यावर शिक्कामोर्तब करतात. मात्र, उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच सर्व काही करायला हवं होतं. असही चव्हाण यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com