Rahul Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! पुण्यात मानहानीचा खटला दाखल; काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal

Savarkar Remarks Row: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. मोदी आडनावाबाबत बदनामी प्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले.

आता सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. राहुल गांधींविरोधात नव्याने मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे.

तक्रार का दाखल केली?

सात्यकी सावरकर यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, राहुल गांधी यांनी यापूर्वी लंडन दौऱ्यावर असताना वीर सावरकरांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले होते. एका मुस्लिम व्यक्तीला सावरकर आणि त्यांचे पाच सहा मित्र मारत होते.

तेव्हा सावरकरांना आनंद होत होता. असं त्यांनी पुस्तकात लिहिले आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांची ही कथा काल्पनिक आहे. यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मानहानी होत आहे, असा दावा करत सात्यकी सावरकर न्यायालयात गेल्या आहेत.

Rahul Gandhi
BJP News : राजकीय परिस्थितींचा आढावा घेतल्यानंतर अमित शाहांची भाजप नेत्यांसोबत शनिवारी बैठक

सात्यकी म्हणाले की, राहुल गांधी केवळ व्होट बँकेसाठी तथ्य नसताना अशी विधाने करत आहेत. आता याबाबत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यायालयाने आम्हाला 15 एप्रिलची तारीख दिली आहे. सात्यकी यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत महाराष्ट्र न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Rahul Gandhi
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नोव्हेंबर 2022 मध्ये, भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी वाशिम जिल्ह्यात आयोजित सभेत सावरकरांबद्दल भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. ते म्हणाले होते की, एकीकडे ब्रिटिशांसमोर न झुकणारे बिरसा मुंडासारखे महान व्यक्तिमत्त्व आहे आणि दुसरीकडे इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत.

ते म्हणाले होते की, सावरकरजी, ते दोन-तीन वर्षे अंदमानात बंदिस्त होते, म्हणून त्यांनी पत्रे लिहायला सुरुवात केली की आम्हाला माफ करा, तुम्हाला जे हवे ते घ्या, मला तुरुंगातून बाहेर काढा. अशी टीका त्यांनी अगोदरही केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com