राज्यभरात 3 जानेवारीला सावित्री उत्सव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मुंबई - देशातील आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारीला राष्ट्र सेवा दलाच्या वतीने राज्यभरात सावित्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी रांगोळी काढून, कंदील लावून आणि दारात ज्ञानाची एक पणती पेटवून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने दर वर्षी सावित्री उत्सव राज्यभरात साजरा केला जातो. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होतात. पुढील वर्षी 3 जानेवारीला सायंकाळी 6.30 वाजता दादर येथील छबिलदास हायस्कूलमध्ये विशेष कार्यक्रम होणार आहे. या वेळी चौकटीबाहेरील काम करणाऱ्या दोन तरुणींच्या मुलाखती आणि अन्य कार्यक्रम होतील, अशी माहिती राष्ट्र सेवा दलाचे मुंबई कार्याध्यक्ष शरद कदम यांनी दिली. 

सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम बंद सभागृहात न घेता घराघरात उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येते. घरासमोर रांगोळी काढून, कंदील लावून, पणती पेटवून, गोडधोड करून हा उत्सव साजरा करावा, असे कदम यांनी सांगितले. 

सावित्रीबाई फुले यांनी शेण-दगडांचा मारा झेलत स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडून दिली. म्हणून त्यांच्या जयंतीचा उत्सव घराघरात साजरा होणे गरजेचे आहे. 
- शरद कदम, कार्याध्यक्ष, राष्ट्र सेवा दल 

Web Title: Savitribai Phule birthday celebration across the state on January 3