Anil Parab address media, demanding action against Minister Yogesh Kadam over alleged obscene activities in family-owned Savli Bar."esakal
महाराष्ट्र बातम्या
Savli Bar Controversy : सरकारची अब्रू वाचवायची असेल तर गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या; उद्धव ठाकरेंच्या नेत्याचे फडणवीसांना आवाहन
Yogesh kadam : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा वाढदिवस आहे मी त्यांना त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांचे प्रताप वाढदिवसाची भेट म्हणून देणार होतो पण ते आज गडचिरोलीत असल्याने उद्या सगळी कागदपत्रे देणार आहे.
गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्याच नावाने असलेल्या बारमध्ये अश्लील कृत्ये होत असतील, सर्व नियम धाब्यावर बसवले जात असतील तर कारवाई कोण करणार? असा सवाल शिवसेना उद्धवव ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी केला. सरकारची अब्रू वाचवायची असेल तरर मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही अनिल परब यांनी केली आहे.

