'एसबीआय'चे ग्राहक आहात, मग ही बातमी वाचाच...

वृत्तसंस्था
बुधवार, 29 जानेवारी 2020

केवायसी प्रक्रिया पुर्ण केली नसल्यास तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. आता ग्राहकांना आपल्या खाते असणाऱ्या ब्रॅचमध्ये जाऊन कागदपत्रे जमा करून आपले केवायसी अपडेट करायचे आहे.

मुंबई : स्टेट बॅंक आॅफ इंडियाने आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. बॅंकेने ग्राहकांना केवाईसी (Know Your Customer) प्रक्रिया त्वरीत पुर्ण करण्यास सांगितले आहे. यासाठी बॅंकेने 28 फेब्रुवारी ही अंतिम तारिख दिली आहे. ही प्रक्रिया दिलेल्या तारखेमध्ये पुर्ण न केल्यास ग्राहकांची सेवा रोखली जाणार असल्याचे बॅंक प्रशासनाने कळविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, एसबीआयकडून मॅसेज पाठवून केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे. बॅंकेने ही प्रक्रिया महत्वाची असल्याचे ग्राहकांना कळविले आहे. तसेच आरबीआयने केवायसी प्रक्रिया सर्वांसाठी सक्तीची केली आसल्याचे एसबीआयने सांगितले आहे.

हेही वाचा ः या संचालकांना तीन महिन्यांची मुदतवाढ

केवायसी प्रक्रियेमुळे बॅंकेचे व ग्राहकांचे नाते घट्ट होते. तसेच केवायसी पुर्ण नसेल तर ग्राहक कुठलीही गुंतवणूक अथवा अकाऊंटमध्ये पैसे काढू किंवा टाकू शकणार नाही. तसेच केवायसी विना तुम्ही तुमचे बॅंक खाते देखील उघडू शकत नाही.

केवायसी प्रक्रिया पुर्ण केली नसल्यास तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. आता ग्राहकांना आपल्या खाते असणाऱ्या ब्रॅचमध्ये जाऊन कागदपत्रे जमा करून आपले केवायसी अपडेट करायचे आहे. ते देखील 28 फेब्रुवारी या तारखेच्या आत.

आवश्य वाचा ः व्हिडिओ - वाघाला बांधीन; पण मोटारीची भ्या वाटते!

केवायसीसाठी काय हवे-
1) पासपोर्ट
2)मतदान ओळखपत्र 
3)ड्रायव्हींग लायसन्स
4)आधार कार्ड
5)नरेगा ओळखपत्र 
6)पॅनकार्ड
अशी आदी कागदपत्रे केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी लागणार असल्याचे बॅंक प्रशासनाने कळविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI says update kyc or bank may freeze your accounts