दहावी-बारावीच्या ‘सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१’ पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात येत आहे.
Exam
ExamSakal

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी (SSC) आणि बारावीत (HSC) उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसेच एटीकेटीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी (Students) ‘सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१’ मध्ये पुरवणी परीक्षा (Supplementary Examination) घेण्यात येणार आहे. दहावीची लेखी परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान, तर बारावीची लेखी परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार लेखी, प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत, तर बारावीची १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केली आहे. या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.

Exam
पदवीधर युवकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या संपूर्ण तपशील

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरूपात दिलेलेच वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री विद्यार्थ्यांनी करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे’, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

दहावी-बारावीच्या ‘सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१’मध्ये होणाऱ्या पुरवणी (लेखी) परीक्षेचा कालावधी :

तपशील : लेखी परीक्षेचा कालावधी

दहावी : २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२१

बारावी (सर्वसाधरण व द्विलक्षी विषय) (जूना व पूनर्रचित अभ्यासक्रम) : १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर २०२१

बारावी (व्यवसाय अभ्यासक्रम) (जूना व पूनर्रचित अभ्यासक्रम) : १६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com