विदर्भातील होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून कै. नारायण बनसोड व कै. सुधा बनसोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने विदर्भातील एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी अशा दोन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली आहे. 

बारावीच्या परीक्षेत किमान ८५ टक्के गुण आवश्‍यक
पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून कै. नारायण बनसोड व कै. सुधा बनसोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने विदर्भातील एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी अशा दोन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली आहे. 

ही शिष्यवृत्ती सुरू करण्यासाठी बनसोड कुटुंबातील पुष्पा सुंदर, आशा उपासनी, अरुण बनसोड, पद्मा ठुसे व प्रदीप बनसोड यांनी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला १२ लाख रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीच्या व्याजामधून दरवर्षी या दोन शिष्यवृत्त्या विदर्भातील गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांतील रहिवासी असलेले व कमी उत्पन्न गटातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्च २०१९ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत ८५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतचिकित्सा, वास्तुविषारद किंवा नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी किंवा विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असणे आवश्‍यक आहे. अशा पात्र विद्यार्थ्यांनी २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा. दोन्ही शिष्यवृत्त्या प्रत्येकी १२ हजार रुपयांच्या असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या मिळणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०१९ आहे. आलेल्या अर्जांमधून ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनी अशा दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करेल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी फाउंडेशनतर्फे संपर्क केला जाईल.

आई-बाबा, मला दोघेही हवे आहात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scholarship for the talented students of Vidarbha