

School Admission Rules Changed
ESakal
मुंबई : शालेय शिक्षण विभागाने पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेशासाठी मुलांचे किमान वय निश्चित केले आहे. यानुसार बालवाटिका-किंवा नर्सरीसाठी तीन वर्षे, बालवाटिका-२ अर्थात ज्युनिअर केजीसाठी चार वर्षे, बालवाटिका-३ अर्थात सीनिअर केजीसाठी पाच वर्षे, तर इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे किमान वय निश्चित करण्यात आले आहे. या नव्या वयोमयदिची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. त्यासाठी प्रत्येक वर्षी ३० जून हा वयाचा मानीव दिनांक (वयाची गणना) राहणार आहे.