महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सुरु होणार शाळा, पण 'ही' आहे अट...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

आज शालेय वर्ष सुरु झालंय. विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत जात नसलेत तरीही ऑनलाईन पद्धतीने आज यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरु झालंय.

मुंबई - आज शालेय वर्ष सुरु झालंय. विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत जात नसलेत तरीही ऑनलाईन पद्धतीने आज यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरु झालंय. दरम्यान यामध्ये आता एक मोठी बातमी समोर येतेय. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागात शाळा सुरु होणार आहेत. शाळांचं वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे असं टीव्ही रिपोर्समध्ये सांगण्यात आलंय. मात्र यातील महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या भागांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार आहे.

आज शालेय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा एक अत्यंत महत्त्वाची मिटिंग झाली. या बैठकीमध्ये घेण्यात आलेला एक महत्त्वाचा निर्णय समोर येतोय. 

BIG NEWS मुंबईकर पावसाच्या प्रतिक्षेत! राज्यात मान्सून दाखल, मुंबईत पावसाचा 'लेट मार्क'

सरकारने शाळा सुरु करण्याबाबतचे मार्गदर्शक तत्त्व काढलेत. प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याची तयारी शिक्षण विभागाची आहे. मात्र यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ज्या भागात शाळा सुरु करायची आहे त्या भागात एक महिना कोरोना रुग आढळला नसावा. असं जरी असलं तरीही संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट शाळा सुरु होणार नाहीयेत. सर्वात आधी १दहावी आणि बारावी चे वर्ग सुरु होतील असं बोललं जातंय. शाळेत सॅनिटायझर मास्क  वापरणं अनिवार्य राहील आणि शाळा एक दिवसाआड भारावल्या जाऊ शकतात. दहावी आणि बारावीनंतर टप्याटप्याने इतर इयत्तांसाठी शाळा सुरु होतील अशी मार्गदर्शक तत्व शालेय शिक्षण विभागाने दिली आहेत. 

BIG NEWS -  आज शाळेची पहिली ऑनलाईन घंटा...चला मुलांनो अभ्यासाला लागा

दरम्यान यासाठीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मागील एक महिन्यात संबंधित भागात एकही कोरोना रुग्ण नसावा  अशी अट आहे आहे.

school education department might start schools in rural parts of maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school education department might start schools in rural parts of maharashtra