esakal | मुंबईकर पावसाच्या प्रतिक्षेत! राज्यात मान्सून दाखल, मुंबईत पावसाचा 'लेट मार्क'
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकर पावसाच्या प्रतिक्षेत! राज्यात मान्सून दाखल, मुंबईत पावसाचा 'लेट मार्क'

मुंबई वगळता राज्यात मान्सूनने पार विदर्भापर्यंत मजल गाठली. त्यामुळं मुंबईकरांना मान्सूनत कधी येणार याची प्रतीक्षा आहे. 

मुंबईकर पावसाच्या प्रतिक्षेत! राज्यात मान्सून दाखल, मुंबईत पावसाचा 'लेट मार्क'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 11 जूनला राज्यात मान्सूनचं आगमन झाले. मात्र मुंबईकर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाळ्याची वाट पाहत आहेत. मागील अनेक दिवस उकाड्यानं हैराण झालेले मुंबईकर मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे उष्ण वातावरणातून लोकांना थोडासा दिलासा मिळाला. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात पावसाळ्याची नोंद झाली आहे. शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मान्सूननं मुंबईत हजेरी लावली.  मान्सूनचा कोकणातील प्रवास गेले तीन दिवस रेंगाळला होता. त्यानंतर मुंबई वगळता राज्यात मान्सूनने पार विदर्भापर्यंत मजल गाठली. त्यामुळं मुंबईकरांना मान्सूनत कधी येणार याची प्रतीक्षा आहे. 

कोरोना चाचणी शिवाय 'नो एन्ट्री'; गावी अडकलेल्या रहिवाशांसाठी सोसायटयांनी काढला फतवा..  

सोमवारी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ते मुसळधार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. मान्सूनने देशातील बहुतेक पश्चिम आणि मध्य भागात दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यात पाऊस वेगाने पुढे जाणं अपेक्षित असून मुंबईत पावसाने जोर धरला आहे, त्यामुळे आज किनारपट्टी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सुरक्षित अंतरासाठी नागरिकांची खासगी वाहनाला पसंती! टू व्हिलर विक्रीला वेग येण्याची आशा 

शनिवारी दुपारनंतर डोंबिवली, नवी मुंबईमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मात्र काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. रविवारी अधूनमधून आकाश ढगाळ होते. 

अखेर लोकल ट्रेन धावली! पण केवळ मर्यादित प्रवाशांसाठी, 'या' आहेत अटी

प्रादेशिक हवामान विभागानं मुंबईसाठी सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे तुरळक आणि काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह पालघरमध्ये गुरुवारपर्यंत तर ठाण्यात बुधवारपर्यंत तुरळक ते काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथेही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

loading image
go to top