esakal | आता प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनीक; शिक्षण विभागाची नवीन नियमावली
sakal

बोलून बातमी शोधा

School

आता प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनीक; शिक्षण विभागाची नवीन नियमावली

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्यात शाळा सुरू (school start) करण्यासाठी मागील महिन्यात शालेय शिक्षण विभागाने (Education Authorities) काढलेल्या मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी केल्या होत्या. त्या सूचना टास्क फोर्सने (task Force) धुडकावल्यामुळे आता शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासाठी सुधारीत सूचनांची (rules) एक नियमावली जाहीर केली जाणार आहे. या नियमावलीत सीएसआरच्या (CSR) निधीचा मोठया प्रमाणावर वापर करून राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक (Health Clinic) उभे केली जाणार आहेत. त्यात उपचारासाठी विविध प्रकारची यंत्रणा ठेवण्याची तयारी केली जाणार आहे.

हेही वाचा: वसई-विरार : अनधिकृत फेरीवाल्यांना आवरा; महापालिकेपुढे कारवाईचे आव्हान

शाळा सुरू करण्यासाठी राज्य टास्क फोर्सने शालेय शिक्षण विभागाने अनेक नवीन सूचना दिल्या असून त्या सूचनांचा अभ्यास केल्यानंतर विभागाने यासाठी नवी सुधारीत नियमावली काढण्याची तयारी केली आहे. त्याचा शासननिर्णयही जाहीर केला जाणार असल्याची माहिती अधिकारी सूत्राकडून देण्यात आली.

राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा विचार करून त्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी सीआरच्या निधीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार असल्याचे स्पष्‍ट केले जाणार आहे. शाळांमध्ये हेल्थ क्लिनीक उभे करताना त्यासाठीची आवश्यक मनुष्यबळ आणि आवश्यता पडल्‍यास डॉक्टरांचीही वेळोवेळी मदत घेतली जाणारआहे. विशेष म्हणजे शाळांमध्ये सर्दी, ताप आदीसारख्या आजारांवरील औषध गोळ्याही ठेवल्या जाणार आहेत.

शाळा सुरू करण्यासाठीच्या नवीन नियमावलीत विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचल्यावर त्याची तपासणी, आरोग्यविषयक काळजीही घेतली जाणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठीच्या विशेष सूचना नव्या नियमावलीत दिल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे शाळा, खेळाची मैदाने, ‍शैक्षणिक साहित्य, आदीं निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. वेळोवेळी पुस्तकांची अदलाबदल टाळण्यासाठीही नियोजन करण्याच्या सूचना यात देण्यात येणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.

loading image
go to top