‘एसईबीसी’ उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’चा पर्याय; आरक्षणाबाबत ‘एमपीएससी’चे स्पष्टीकरण

ज्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून (एसईबीसी) अर्ज केला आहे, त्यांना खुला (ओपन) किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे.
MPSC
MPSCSakal

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) भरण्यात येणाऱ्या पदांसाठी (Post) ज्या उमेदवारांनी (Candidate) सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून (एसईबीसी) (SEBC) अर्ज केला आहे, त्यांना खुला (ओपन) किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) (EWS) यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे. (SEBC Candidate EWS Option Reservation MPSC Explanation)

या उमेदवारांना या दोनपैकी एक पर्याय निवडून ऑनलाइन फेरअर्ज करण्यासाठी २३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयोगाने डिसेंबर २०१८ मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार काही उमेदवारांनी ‘एसईबीसी’ आरक्षणातून भरतीसाठी अर्ज केले होते. तथापि, या भरती प्रक्रिया अद्याप प्रलंबितच आहेत.

MPSC
बारावीच्या मुल्यांकनासाठी सूत्र ठरलं; रविवारी पुन्हा बैठक

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षण रद्द केले. त्यामुळे या आरक्षणानुसार पद भरती होऊ शकत नसल्याने राज्य सरकारने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आयोगाने याबाबतचे पत्रक आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com