सोलापूर जिल्ह्यातील 5581 मराठा तरुणांना ‘SEBC’चे प्रमाणपत्र! ‘कुणबी’त नसलेल्या मराठा तरूणांना 10 टक्के आरक्षण; प्रमाणपत्र देण्याची ‘इतकी’ मुदत

जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय मराठा समाजाला राज्य सरकारने १० टक्के आरक्षण (एसईबीसी) दिले आहे. त्यानुसार १५ मार्च ते १३ मे या दोन महिन्यात प्रमाणपत्रासाठी ५५८१ जणांनी प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. त्यापैकी ५३८९ तरुणांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत.
Caste Certificate
Caste Certificateesakal

सोलापूर : जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय मराठा समाजाला राज्य सरकारने १० टक्के आरक्षण (एसईबीसी) दिले आहे. त्यानुसार १५ मार्च ते १३ मे या दोन महिन्यात प्रमाणपत्रासाठी पाच हजार ५८१ जणांनी प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. त्यापैकी पाच हजार ३८९ तरुणांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत. आता केवळ १८१ अर्ज प्रलंबित असून त्याही तरुणांना काही दिवसांत प्रमाणपत्र वितरित होतील.

सोलापूर जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय एक व दोन, कुर्डुवाडी, पंढरपूर, मंगळवेढा व अकलूज याठिकाणी प्रांताधिकारी कार्यालये आहेत. तहसीलदारांच्या माध्यमातून आलेल्या जातीच्या प्रमाणपत्रांवर प्रांताधिकारी जास्तीत जास्त ४५ दिवसांत निर्णय घेतात. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये किंवा प्रमाणपत्र नसल्याने नोकरीसाठी अडचणी येणार नाहीत हा विचार करून अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रे लवकर वितरित केली जात आहेत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार जे मराठा तरुण ‘कुणबी’मध्ये नाहीत, परंतु ते सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना १० टक्के आरक्षणातून एसईबीसी प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यासाठी आठ लाख रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा आहे.

शासनाच्या माध्यमातून मागासलेल्या मराठा तरुणांना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळत असल्याने नोकरीसाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी तहसीलदार, प्राताधिकाऱ्यांना ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र अर्जदारांना वेळेत देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सध्या कार्यवाही सुरू आहे.

तालुकानिहाय अर्जांची स्थिती

 • तालुका अर्ज प्रमाणपत्र वितरित

 • उत्तर सोलापूर ३५० ३४२

 • बार्शी ८७० ८६६

 • द. सोलापूर १०४ १०२

 • मंद्रूप ६६ ६६

 • अक्कलकोट १२२ १२२

 • माढा ९५८ ९१३

 • करमाळा ६६४ ६३०

 • पंढरपूर ५०७ ५०६

 • मोहोळ ६५३ ६५१

 • मंगळवेढा ४५४ ४४४

 • सांगोला ५५३ ५२३

 • माळशिरस २८० २२४

 • एकूण ५,५८१ ५,३८९

‘एसईबीसी’ प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे

‘एसईबीसी’ प्रमाणपत्र काढण्यासाठी तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा किंवा शाळेचा दाखला तथा बोनाफाईड, वडिलांचा शाळेचा दाखला, आधारकार्ड, हिंदू-मराठा नोंद असलेला १९६७ पूर्वीचा पुरावा अशी कागदपत्रे जोडून आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून अर्ज करावा लागतो. पण, ज्यांची कुणबीमध्ये नोंद नाही आणि वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच ‘एसईबीसी’साठी अर्ज करता येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com