अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी ९ जुलैनंतर! प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना बदलावा लागेल महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम; ११०८ तुकड्यांसाठी एकही अर्ज नाही

सोलापूरसह राज्यभरातील विज्ञान, वाणिज्य व कला शाखेच्या साडेनऊ हजार महाविद्यालयांमधील एक हजार १०८ तुकड्यांमध्ये प्रवेशासाठी एकाही विद्यार्थ्याने अर्ज केलेला नाही. त्यात अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये आहेत.
11th Class Admission
11th Class Admission sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता अकरावीची पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून विद्यार्थ्यांना आजपासून (ता. ३०) जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर ९ जुलैला रिक्त राहिलेल्या जागांची महाविद्यालयेनिहाय यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना त्या त्या महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम भरून अर्ज पुन्हा अपलोड करावा लागणार आहे.

सोलापूरसह राज्यभरातील विज्ञान, कला व वाणिज्य शाखांच्या सहा लाख ९२ हजार ६८१ विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यात राज्यभरातील विज्ञान शाखेसाठी अर्ज केलेल्या सहा लाख नऊ हजार ७१८ विद्यार्थ्यांपैकी तीन लाख ४२ हजार ८०१ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून उर्वरित जागांसाठी ९ जुलैनंतर दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात ६२ हजार प्रवेश असून त्यात ३५ हजारांवर विज्ञान शाखेच्या जागा आहेत.

पहिल्या यादीत बहुतेक महाविद्यालयांचे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मेरिट ४२५ तर भटक्या जाती-जमातीचे मेरिट ४२३ गुणांना क्लोज झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पहावी लागणार आहे. ८ जुलैला रिक्त जागांची यादी जाहीर झाल्यावर त्या-त्या महाविद्यालयांमधील रिक्त जागांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना पसंतीक्रम टाकावा लागणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना पाहिजे त्या महाविद्यालयात प्रवेश सहजपणे मिळू शकेल, अन्यथा त्यांना पुन्हा तिसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

११०८ तुकड्यांसाठी एकही अर्ज नाही

सोलापूरसह राज्यभरातील विज्ञान, वाणिज्य व कला शाखेच्या साडेनऊ हजार महाविद्यालयांमधील एक हजार १०८ तुकड्यांमध्ये प्रवेशासाठी एकाही विद्यार्थ्याने अर्ज केलेला नाही. त्यात अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये आहेत. आता दुसऱ्या, तिसऱ्या गुणवत्ता यादीत या तुकड्यांसाठी विद्यार्थी अर्ज करतील, अशी संस्थांना आशा आहे. अन्यथा, या तुकड्यांना कुलूप लावावे लागू शकते, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

दुसऱ्या यादी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात

अकरावीच्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांनी ७ जुलैपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर ८ जुलैला रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होईल, त्यानुसार प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम टाकावा. जेणेकरून त्यांना दुसऱ्या यादीत प्रवेश मिळेल.

- महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com