पालिका निवडणुकीचा दुसरा टप्पा 14 डिसेंबरला - ज. स. सहारिया

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

आयुक्तांची माहिती; चौदा नगराध्यक्षपदासाठी 106 उमेदवार रिंगणात
मुंबई - नगर परिषद निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबर रोजी मतदान होत असलेल्या पुणे आणि लातूर जिल्ह्यातील 14 नगर परिषदांच्या 324 नगरसेवकपदांसाठी 1 हजार 326; तर थेट नगराध्यक्षपदाच्या 14 जागांसाठी 106 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.

सहारिया यांनी सांगितले की, या 14 नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी सर्व नामनिर्देशनपत्रे संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त झाली आहेत. या सर्व ठिकाणी 14 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबर 2016 रोजी मतमोजणी होईल. नगर परिषदनिहाय सदस्यपदांसाठी आणि थेट नगराध्यक्षपदांसाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या अशी (कंसात एकूण जागा): पुणे : बारामती (39)- 171 व 7, तळेगाव- दाभाडे (26)- 51 व 2, लोणावळा (25)- 111 व 6, दौंड (24)- 112 व 9, जुन्नर (17)- 70 व 13, शिरूर (21)- 72 व 5, आळंदी (18)- 57 व 8, सासवड (19)- 53 व 6, जेजुरी (17)- 51 व 5 आणि इंदापूर (17)- 77 व 7. लातूर : उदगीर (38)- 185 व 12, अहमदपूर (23)- 115 व 6, औसा (20)- 101 व 13 आणि निलंगा (20)- 100 व 7.

Web Title: The second phase of municipal elections on December 14