महत्त्वाची बातमी : दस्त नोंदणीचे काम सुरू होणार, पण...; नोंदणी महानिरीक्षकांच्या सूचना!

Registrar-Office
Registrar-Office
Updated on

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे राज्यात सर्वत्र दस्त नोंदणीचे काम बंद आहे. स्थिती नियंत्रणात असलेल्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊनच दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यात येतील. कार्यालय सुरू करताना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.

राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये, मुद्रांक जिल्हाधिकारी, विवाह अधिकारी कार्यालये 20 मार्चपासून बंद आहेत. परिस्थिती नियंत्रणात आलेल्या भागात जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतरच दुय्यम निबंधक कार्यालये, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये व विशेष विवाह अधिकारी कार्यालये पुरेशी खबरदारी घेऊन सुरु करण्यात येतील. त्यावेळी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुय्यम निबंधकांना कार्यालय सुरु (लॉग इन) करण्यामाठी आय-सरिता प्रणालीमध्ये अंगठ्याची ठशाची पद्धत रद्द करण्यात येत आहे. त्याऐवजी मोबाईलवर 'ओटीपी' ची पद्धत कार्यान्वित करण्यात येणार आहे. 

आरोग्याची दक्षता घेण्याबाबत उपाययोजना : 
कार्यालये सुरु करण्याच्या दिवशी आणि त्यानंतर प्रत्येक आठवड्यात संपूर्ण कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. कर्मचाऱ्यांचे स्क्रिनिंग करण्यात यावे. दुय्यम निबंधक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर  सॅनिटाइजर आणि स्वयंचलित  निर्जंतुकीकरण व्यवस्था करावी. मास्कशिवाय कार्यालयात प्रवेश देऊ नये. पक्षकार व वकील यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात प्रवेश करताना केवळ दस्त नोंदणीची कागदपत्रे आणावीत. बॅग किंवा पर्स सोबत आणता येणार नाही. दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये पोलीस आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त घ्यावा, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या आहेत.

दस्त नोंदणी करताना दक्षता :
- कार्यालयात एकावेळी एका दस्ताची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
- दस्त नोंदणीसाठी जिल्हा मुख्यालय  estep-in किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य राहील. नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी दिलेल्या वेळेतच कार्यालयात यावे.
- जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- पक्षकाराने केवळ फोटो काढताना मास्क खाली घ्यावा. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे पेन आणणे आवश्यक.
- कार्यालयात गर्दी कमी करण्यासाठी सामाजिक अंतर राखावे तसेच
नागरिकाना 'आपले सरकार' संकेतस्थळ आणि ई-रजिस्ट्रेशनचा पर्याय उपलब्ध.

दस्तनोंदणी सकाळी 9 ते सायंकाळी सातपर्यंत : 
सर्व कार्यालयांवर कामकाजाचा ताण येण्याची शक्यता आहे. याकरिता दस्त नोंदणीसाठी कार्यालयाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कार्यालय सुरू ठेवण्याबाबत सह जिल्हा निबंधक यांनी निर्णय घ्यावा.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे याठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यास मान्यता मिळणे सध्या अशक्य आहे. ज्या भागात प्रादुर्भाव कमी आहे, अशा ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतरच आवश्यक खबरदारी घेऊन कार्यालय सुरू करण्यात येतील.
- जी. एस. कोळेकर, सह जिल्हा निबंधक, मुद्रांक नोंदणी विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com