Security Withdrawn: मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली; मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली; नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ

मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली; नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ

मुंबई : महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा मोठा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक राहिलेले मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Security of big leaders of MVA was withdrawn Increase in Milind Narvekar security)

हेही वाचा: FireCrackers: माणुसकीला काळीमा! तोंडात फटका फुटल्यानं गायीचा जबडा उद्ध्वस्त

मविआच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा शिंदे सरकारनं काढली आहे. यामध्ये वरुण सरदेसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनिल केदारे, डेलकर कुटुंबिय यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. तर मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, ती वाय प्लस एस्कॉर्ट करण्यात आली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. या दोघांचीच सुरक्षा कायम ठेवण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्याचबरोबर ठाकरे, पवार कुटुंबियांची सुरक्षा मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा: Nancy Pelosi: अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पॅलोसींच्या घरावर हल्ला; पती जखमी

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर उमेदवार होते. त्यावेळी आशिष शेलार, शरद पवार यांनी त्यांना मदत केली होती. पण ठाकरे कुटुंबाची तीन मत त्यांना मिळू शकत नव्हती. त्यामुळं नार्वेकर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच कदाचित त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, अशी चर्चाही सुरु झाली आहे.